जयाचे दर्शन समाधाना ठाव, तयाचेची नाव ‘तीर्थराज’ ।

जाहले जे निःसंग, तयाचा जो सखा श्रीहरि, तो देखा काय बोले ।
गृहस्थाश्रमाचे आधीच जे ओझे ।
कपाळी ते सहजे आले असे ॥ १ ॥

परि ते संन्यासे फेकूं पाहे दूर ।
तोचि पुन्हा संन्यासाचा भार ।
आपुल्याची ठायी आहे योगसुख (ते तू दिलेस देवा) ॥ २ ॥

स्वभावे तोची पहावे ऐसे बोल हरीचे ।
जयाचे दर्शन समाधाना ठाव ।
तयाचेची नाव ‘तीर्थराज’ ॥ ३ ॥

– कृष्णपुष्प (पुष्पांजली), बेळगाव (१८.८.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक