|

नवी देहली – सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या निमित्ताने केंद्रशासनाने आयोजक सनातन संस्थेला ६३ लाख रुपये दिल्यावरून काँग्रेसला पोटशूळ उठला. काँग्रेसने यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन सनातन संस्थेची नाहक अपकीर्ती केली. आता यावरून सनातन संस्थेने काँग्रेस, तसेच साम्यवादी नि हिंदुद्वेष्टी प्रसारमाध्यमे यांच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी यासंदर्भात ‘सनातन प्रभात’ला सांगितले की, आमची अपकीर्ती करणार्यांचा आम्ही केवळ निषेधच करत नाही, तर ज्या व्यक्तींनी सनातन संस्थेचा अपप्रचार केला आहे, तसेच ज्यांनी ‘या कार्यक्रमात ‘वन्दे मातरम्’ गायलेच गेले नाही’, असा खोटा प्रचार केला आहे, त्या सर्वांना आम्ही कायदेशीर नोटीस पाठवत आहोत. त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करू. राज्यघटनेच्या चौकटीत त्यांना उत्तर द्यावेच लागेल.
🚨 Legal Notice: @SanatanSanstha to move court against entities defaming the 'Sanatan Rashtra Shankhnaad Mahotsav' and the organization.
The Sanstha further stated that the ongoing opposition to 'Vande Mataram' is driven by a policy of appeasement. 🚩⚖️#BreakingNews… https://t.co/npboVAdx90 pic.twitter.com/tpFpbBMtho
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 21, 2026
श्री. वर्तक म्हणाले की,
१. देहलीत डिसेंबर २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवाला सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रांत देशभरात कार्यरत असलेल्या १ सहस्रांपेक्षा अधिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. देहलीतील मान्यवरही सहस्रोंच्या संख्येने या कार्यक्रमात आले होते.
दिल्ली में आयोजित सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव में 1000+ सामाजिक, सांस्कृतिक और आध्यात्मिक संगठनों की ऐतिहासिक भागीदारी हुई और ‘वंदे मातरम्’ के 150 वर्ष पूर्ण होने पर भव्य प्रदर्शनी व सामूहिक गायन हुआ।
इसके बावजूद कांग्रेस व वामपंथी तत्वों द्वारा विरोध और सनातन संस्था के विरुद्ध… pic.twitter.com/uG5nqq8FuX
— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) February 21, 2026
२. ‘वन्दे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त एका भव्य प्रदर्शनाचे आयोजन याच कार्यक्रमाचा एक भाग होता. वन्दे मातरम्चे सामूहिक गान झाले आणि याच काळात काँग्रेसच्या काही नेत्यांना, ‘या कार्यक्रमात झालेल्या वन्दे मातरम्’च्या उद्घोषाला आम्ही विरोध केला, तर मुसलमान खुश होतील’, असे वाटू लागले. यामुळेच काँग्रेसच्या काही नेत्यांनी याला विरोध करण्यास आरंभले आहे.
हे ही वाचा → केंद्रशासनाने सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला ६३ लाख रुपये दिल्यावरून काँग्रेस आणि साम्यवादी यांना पोटशूळ ! |
३. साम्यवादी विचारसरणीचे काही लोकही याला विरोध करत आहेत. ज्यांनी काँग्रेसचे सरकार असतांना देशाच्या कानाकोपर्यांत अनेक भूखंड मिळवले आणि सरकारच्या प्रायोजकत्वाखाली इतक्या भव्य कार्यक्रमांचे आयोजन केले, त्या कार्यक्रमांतून हिंदु धर्मावर चिखलफेक करण्याचे काम केले, त्याच संघटना आज सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला विरोध करत आहेत. ही मोठी आश्चर्याची आणि दुर्दैवी गोष्ट आहे.

खासगी संस्थांची नोंदणी अनिवार्य नाही !
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
तुर्भे रेल्वेस्थानकाच्या जवळील पदपथांची दुरवस्था !
तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे तोडली : महापालिकेची कारवाई
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद