|

ठाणे, २ फेब्रुवारी (वार्ता.) – श्री पीर हाजी मलंग साहेब दर्गा ट्रस्ट (ई-६०)ची वक्फ नोंदणी १३ मार्च २०२५ या दिवशी वक्फ न्यायालयाने रहित केली. तरीही श्री मलंगगडावर आजही देणगी गोळा केली जात आहे. स्वयंघोषित विश्वस्त जुन्या वक्फ क्रमांकाच्या पावत्या वापरून भाविकांकडून पैसे उकळत आहेत. त्यामुळे ‘हा प्रकार म्हणजे केवळ भाविकांची फसवणूक नसून कायद्याची थेट पायमल्ली आणि आर्थिक अपहार आहे’, असे भाविकांचे म्हणणे आहे. या प्रकरणी श्री मलंगगड आंदोलनातील कार्यकर्ते श्री. समीर भंडारी आणि श्री. पराग तेली यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.
तक्रारदारांनी म्हटले की,…
१. वक्फ नोंदणी रहित झाल्यानंतर संबंधित विश्वस्त संस्थेला कोणत्याही प्रकारे देणगी स्वीकारण्याचा अधिकार नसतांना हा प्रकार चालू रहाणे म्हणजे धर्मदाय आयुक्त, महाराष्ट्र शासन आणि न्यायालयीन आदेश यांना उघडपणे धुडकावून लावणे होय !
२. यापूर्वी वारंवार तक्रारी करूनही पोलिसांनी ठोस कारवाई न केल्याने पोलीस प्रशासनाच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त होत आहे. कारवाई न करणे म्हणजे अप्रत्यक्ष पाठबळ देणे नाही का ?
३. श्री मलंगगड यात्रेच्या काळात सहस्रो भाविक दर्शनासाठी येत असतांना अशा बेकायदेशीर देणगी संकलनामुळे श्रद्धेचा गैरफायदा घेतला जात आहे. स्वयंघोषित विश्वस्तांच्या विरोधात तातडीने चौकशी करून त्यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे नोंद करावेत.
मलंगभक्तांची इच्छा न्यायदेवता पूर्ण करील ! – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेठाणे – जिल्ह्यातील श्रीक्षेत्र मलंगगडावर प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही २ फेब्रुवारी या दिवशी श्री मलंगयात्रा पार पडली. या वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गडावर मलंगबाबांची आरती करण्यात आली.
आरतीनंतर उपमुख्यमंत्री म्हणाले, ‘‘गेल्या अनेक वर्षांपासून मलंगगडाच्या संदर्भात न्यायालयीन खटला चालू आहे. लवकरच मलंगभक्तांची इच्छा न्यायदेवता पूर्ण करील.’’ मलंगगड येथे नाथ संप्रदायाचे स्वामी मच्छिंद्रनाथ यांचे मंदिर होते. मुसलमानांनी त्याचे दर्ग्यात रूपांतर केले. हे मंदिर पुन्हा मिळण्यासाठी हिंदू कायदेशीर लढा देत आहेत. त्या संदर्भात उपमुख्यमंत्री बोलत होते. हे ही वाचा → Eknath Shinde visits Malang Gad : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्रीक्षेत्र मलंगगडावर आरती ! |
संपादकीय भूमिका
|
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी