ऋतूंनुसार पाण्यात घालण्याची औषधे
‘थंडी आणि पावसाळा यांत सुंठ, तर उष्णतेच्या दिवसांत वाळा घातलेले पाणी प्यावे. यामुळे त्या त्या ऋतूंत सामान्यपणे होणारे विकार टाळण्यास साहाय्य होते.
‘थंडी आणि पावसाळा यांत सुंठ, तर उष्णतेच्या दिवसांत वाळा घातलेले पाणी प्यावे. यामुळे त्या त्या ऋतूंत सामान्यपणे होणारे विकार टाळण्यास साहाय्य होते.
‘ताप असतांना साधे पाणी पिऊ नये. एक लिटर पाण्यामागे पाव चमचा या प्रमाणात ‘सनातन मुस्ता (नागरमोथा) चूर्ण’ घालून ५ मिनिटे पाणी उकळावे. हे पाणी तहान लागेल तेव्हा थोडे थोडे कोमट करून प्यावे. असे पाणी प्यायल्याने ताप उतरण्यास साहाय्य होते आणि शक्तीही टिकून राहते.’
कोणत्याही कारणामुळे एकाएकी पोट दुखत असेल, तर २ ते ४ पेले कोमट पाणी प्यावे आणि स्वस्थ बसून रहावे. पाणी प्यायल्याने काही अपाय होत नाही. अधिकचे पाणी काही वेळाने लघवीवाटे बाहेर निघून जाते. पाणी पिऊन २ घंट्यांनीही बरे न वाटल्यास मात्र तज्ञांचा समादेश (सल्ला) घ्यावा.
कधीतरी गंमत म्हणून सरबत प्यायल्यास चालते; परंतु प्रतिदिन सरबत पिण्याची सवय आरोग्याला चांगली नसते. सरबतातून अनावश्यक साखर पोटात जाते. साखर आरोग्याला हानीकारक असते. त्यामुळे सरबताऐवजी साधे पाणीच प्यावे.
‘थंडीच्या दिवसांत उष्ण, तर उष्णतेच्या दिवसांत थंड पाणी प्यावे. थंड, म्हणजे शीतकपाटातील नव्हे. उन्हाळ्यात माठातील (मातीच्या मडक्यातील) पाणी प्यायल्याने मन प्रसन्न होते. अन्य ऋतूंमध्ये माठातील पाणी पिऊ नये. विकार असतांना उकळलेले पाणी कोमट किंवा थंड करून प्यावे.’
सौभाग्यवतीच कुंकू लावतात. विधवा स्त्रिया कुंकू लावत नाहीत. स्त्रियांच्या प्रजननक्षमतेशी याचा काही संबंध आहे का ?
ठिबक सिंचनामध्ये एका वेळी अधिक पाणी न देता थेंब थेंब पाणी दिले जाते. या पाण्याचा झाडाला पुरता उपयोग होतो. त्याप्रमाणे शरिरालाही पुरेसे पाणी मिळावे, यासाठी एकाएकी गटागट पाणी न पिता थोड्या थोड्या वेळाने एकेक घोट प्यावे.
‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ असल्याने प्रत्येक व्यक्तीची पाण्याची आवश्यकता वेगळी असू शकते. त्यामुळे पाणी किती प्यावे, यासंबंधी स्वतःच्या बुद्धीने निर्णय घेण्यापेक्षा ईश्वरी संवेदनेनुसार तहान लागते, तेव्हा थोडे थोडे पाणी प्यावे.’
अन्नाचे योग्य पचन होण्यासाठीसुद्धा ते अधिक घट्ट किंवा पातळ असू नये. त्यामुळे ‘जेवतांना आवश्यकतेनुसार मध्ये मध्ये थोडे थोडे पाणी प्यावे’, असे आयुर्वेदात सांगितले आहे.
पाणी पिऊन शौचाला होण्यापेक्षा जठराग्नी (पचनशक्ती) चांगला असणे महत्त्वाचे आहे. तो चांगला राहिला, तर योग्य वेळी आपणहून शौचाला होतेच, त्यासह आरोग्यही चांगले रहाते.