निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ९२
‘कणीक भिजवतांना पाणी न्यून झाले, तर ती घट्ट होते आणि पोळ्या लाटतांना जड जातात. पाणी अधिक झाले, तर कणीक पातळ होते आणि ती पोळपाटाला चिकटते. कणीक भिजवतांना पाण्याचे प्रमाण योग्य असेल, तरच पोळ्या व्यवस्थित लाटता येतात. अन्नाचे योग्य पचन होण्यासाठीसुद्धा ते अधिक घट्ट किंवा पातळ असू नये. त्यामुळे ‘जेवतांना आवश्यकतेनुसार मध्ये मध्ये थोडे थोडे पाणी प्यावे’, असे आयुर्वेदात सांगितले आहे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.११.२०२२)