निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ९९
‘थंडी आणि पावसाळा यांत सुंठ, तर उष्णतेच्या दिवसांत वाळा घातलेले पाणी प्यावे. यामुळे त्या त्या ऋतूंत सामान्यपणे होणारे विकार टाळण्यास साहाय्य होते. पाणी उकळतांना १ लिटर पाण्यामागे (चहाचा) पाव चमचा सुंठ घालावी. पाणी अधिक तिखट लागल्यास सुंठीचे प्रमाण न्यून करावे.
वाळा चूर्ण घालण्यासाठी पाणी उकळायलाच हवे, असे नाही. सुंठीएवढ्या प्रमाणातच वाळा चूर्ण घालावे. सनातनची सुंठ आणि वाळा ही चूर्णे उपलब्ध आहेत.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.११.२०२२)