स्वामी विवेकानंदांचे युवकांसाठी संदेश

स्वामी विवेकानंद

१. ‘उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ।’ , म्हणजे ‘ उठा ! जागे व्हा ! आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका !

२. देशाला सशक्त, उत्साही, श्रध्दावान आणि निष्कपट असे युवक हवे आहेत.

३. धीट व्हा, भिऊ नका, निर्भय व्हा !

४. युवकांनो, तुम्ही सिंहस्वरूप असूनही स्वत:ला मेषतुल्य (मेंढ्यासारखे) का समजता ?

५. प्रत्येक मनुष्य हा मूलतः अनंत शक्तीसंपन्न असतो.

६. सामर्थ्य हेच जीवन आणि दुर्बलता हाच मृत्यू होय. दुर्बलता म्हणजे निष्प्राणता, निर्जीवता !

७. बल हेच चिरंतन आणि शाश्वत जीवन आहे.

८. ऐहक आणि आध्यात्मिक क्षेत्रात भय हेच अध:पतनाचे कारण आहे; म्हणूनच निर्भय व्हा ! समर्थ व्हा !

९. स्वत:वर श्रद्धा ठेवा, श्रद्धमध्ये अद्भुत सामर्थ्य आहे.

१०. स्वत:ला दुर्बल मुळीच समजू नका, तुम्ही जसा विचार कराल तसेच बनाल.

११. विश्वास किंवा श्रध्दा हा धर्माचा पाया आहे.

१२. युवकांनो, तुम्ही अमृताचे पुत्र आहात. राष्ट्राला युवाचेतनेची आवश्यकता आहे.

१३. हे वीर युवकांनो, उठा ! स्वत:चे भवितव्य ठरविण्याचा हाच क्षण आहे.

१४. श्रेष्ठ आदर्श डोळ्यांसमोर ठेवा. आदर्शासाठी सर्वस्व समर्पण करा.

१५. बळकट हातांची एकत्र गुंफण म्हणजेच संघटन ! संघटनेविना कोणतेही श्रेष्ठ आणि चिरस्थायी कार्य होत नाही.

साभार : ‘वेबदुनिया मराठी’ संकेतस्थळ