आज देशाला कशाची आवश्यकता आहे ?

स्वामी विवेकानंद

आज आपल्या देशाला लोखंडी स्नायूंची आणि पोलादी मज्जातंतूंची खरी आवश्यकता आहे. आज आवश्यक आहे अशा दुर्दम्य इच्छाशक्तीची की, जी विश्वाची गूढ रहस्ये उकलील आणि आवश्यकता पडल्यास महासागराच्याही तळाशी जाऊन अन् प्रत्यक्ष मृत्यूला तोंड देऊन स्वतःचे उद्दिष्ट साध्य करून घेईल. स्वतःचा विकास करा. ध्यानात ठेवा की, गती आणि वाढ हीच केवळ जिवंतपणाची लक्षणे होत. फसवणूक करून कोणतेही मोठे कार्य होत नसते.

– स्वामी विवेकानंद (साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)