श्रीलंकेला आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी हवे २२ सहस्र कोटी रुपये !  

श्रीलंका दिवाळखोर झाला आहे. देशाकडे केवळ ५ सहस्र कोटी रुपयांची विदेशी चलनाची गंगाजळी शिल्लक राहिली आहे. या स्थितीतून श्रीलंकेला  बाहेर येण्यासाठी सुमारे २२ सहस्र कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

श्रीलंकेत भारतीय सैन्य तैनात होणार नाही ! – भारतीय उच्चायुक्त 

श्रीलंकेतील आर्थिक संकटावरून निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे येथे भारतीय सैन्य तैनात करण्याविषयी चर्चा चालू आहे. श्रीलंकेतील भारताचे उच्चायुक्त यांनी ‘याविषयीच्या अफवा निराधार आहेत’, असे म्हटले आहे.

भारताकडून श्रीलंकेला ७६ सहस्र मेट्रिक टन पेट्रोल-डिझेलचे साहाय्य !

मोठ्या आर्थिक संकटाशी सामना करत असलेल्या श्रीलंकेला भारत सातत्याने साहाय्य पुरवत आहे. भारताने श्रीलंकेला इंधनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी दुसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेल यांचा पुरवठा केला.

श्रीलंकेने आणीबाणी उठवली

राजधानी कोलंबोमध्ये मुसळधार पावसात सहस्रो विद्यार्थ्यांनी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या घरावर मोर्चा काढला. ‘सरकारने चीनला सर्व काही विकून टाकल्याने सरकारकडे आता पैसेच नाहीत’, असा आरोप आंदोलकांनी केला.