
इंदूर (मध्यप्रदेश) येथील थोर संत प.पू. भक्तराज महाराज एकदा त्यांच्या भक्तांसह पंढरपूर येथे गेले होते. रात्री १० वाजता प.पू. बाबा पांडुरंगाच्या समोर उभे राहिले. बाबांनी पांडुरंगाच्या गळ्यात हार घातला आणि पेढ्याच्या पुडीतील एक पेढा उचलून पांडुरंगाच्या मुखाला लावला. तेव्हा तो गायब झाला. बडव्यांनी तेथील सर्व हार दूर केले. त्यांना पेढा कुठेही मिळाला नाही. बाबांनी पांडुरंगाच्या चरणांना स्पर्श केला, तेव्हा त्यांना उजव्या चरणाजवळ अर्धा पेढा मिळाला. प.पू. बाबा भक्तांना म्हणाले, ‘‘आनंदाश्रू ‘गुरुमाऊलीने प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन घडवले आणि मी पांडुरंगाला पेढा भरवला’, या विचाराने, तर दुःखाश्रू ‘परमेश्वराला पाषाणातून प्रत्यक्ष यायला किती कष्ट पडले असतील’, या विचाराने आले. (संदर्भ : sanatan.org)
भय घालवण्यासाठी प्रयत्न करायला हवा !
श्रद्धेचा आरंभ !
क्रियायोग
सर्वसाधारण व्यक्ती आणि साधक यांच्या विचारसरणीतील मूलभूत भेद !
पैशापेक्षा भगवंतावर श्रद्धा ठेवणे श्रेष्ठ !
अध्यात्म शिकण्यापेक्षा प्रत्यक्ष साधना करणे महत्त्वाचे !