१. भावनिर्मितीसाठी सूचना
अ. देवाच्या कृपेने जग पुष्कळ सुंदर आहे आणि मी या सुंदरतेचा आनंद घ्यायला आलो आहे.
आ. देवाच्या कृपेने मी भूतकाळातील सर्व घटना विसरलो आहे. आता मी वर्तमानात राहून आनंद अनुभवत आहे.
इ. देवाच्या कृपेने माझ्यात क्षमता, ऊर्जा, उत्साह, बळ, जिद्द आणि चिकाटी आहे.
ई. देवाच्या कृपेने मी जीवनातील प्रत्येक परिस्थितीचा आनंदाने स्वीकार करतो.
उ. समर्पण केल्यामुळे माझी चिंता मिटली आहे आणि मी देवाच्या कृपेने चिंतामुक्त झालो आहे.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा दृढ होण्यासाठी सूचना
अ. परात्पर गुरु डॉक्टर हे विष्णूचे अवतार आणि आनंदाचे सागर आहेत. मीसुद्धा आनंद स्वरूप आहे.
आ. परात्पर गुरु डॉक्टर हे परम शांतीचे सागर आहेत आणि माझ्या आतही अनंत शांती आहे.
इ. मी परात्पर गुरु डॉक्टर यांच्यापासून दूर नाही आणि परात्पर गुरु डॉक्टर माझ्यापासून दूर नाहीत.
ई. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने माझ्या मनात नेहमी सकारात्मक, प्रेमाचे आणि आनंदाचे विचार येतात.
उ. माझ्या मनातील नकारात्मक विचारांना सकारात्मक आणि भावपूर्ण विचारांमध्ये पालटणे, मला परात्पर गुरु डॉक्टर यांच्या संकल्पाने जमायला लागले आहे.
ऊ. मला परात्पर गुरु डॉक्टर यांच्या ‘देव करतो, ते भल्यासाठीच !’, या विचारावर पूर्ण विश्वास आहे.
ए. मी गुरुकृपेने ईश्वरप्राप्ती करणारच आहे.
– (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.