एके दिवशी हिरण्यकश्यपूने त्याच्या पुत्राला मांडीवर घेऊन विचारले की, बाळ प्रल्हादा, इतके दिवस तू गुरुजींकडून जे ज्ञान प्राप्त केलेस त्यांपैकी काही चांगल्या गोष्टी मला सांग. तेव्हा प्रल्हाद म्हणाला, ‘‘भगवान विष्णूंच्या भक्तीचे ९ प्रकार आहेत’’, असे म्हणून त्याने नवविधा भक्तीचे प्रकार हिरण्यकश्यपूला सांगितले.

श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् ।
अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ।।
अर्थ : श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन असे भक्तीचे ९ प्रकार आहेत. या ९ प्रकारांनाच नवविधा भक्ती असे म्हणतात.
१. श्रवणभक्ती : भगवंताचे यश, गुण, माहात्म्य इत्यादी गोष्टी श्रद्धायुक्त अंत:करणाने ऐकणे ही श्रवणभक्ती होय.
२. कीर्तन : कीर्तनात जे वातावरण निर्माण होते, त्यात भावविवशता आणि आनंदमयता आपोआप प्राप्त होते.
३. स्मरणभक्ती : सतत भगवंताचे स्मरण करणे ही स्मरणभक्ती होय.
४. पादसेवनभक्ती : देवता किंवा गुरु यांच्या चरणांचे पूजन किंवा स्मरण ही पादसेवनभक्ती होय.
५. अर्चनभक्ती : श्रद्धा आणि आदर यांनी युक्त अशी पूजा करणे याला अर्चनभक्ती म्हणतात.
६. वंदनभक्ती : भगवंताच्या पुढे नतमस्तक होऊन त्याच्या अनंत महिम्यांचे अंतरात ध्यान करत, त्याची स्तुती करणे याला वंदनभक्ती म्हणतात.
७. दास्यभक्ती : श्रीहरि हाच माझा मायबाप आहे, प्रभु सर्वकाही आहे आणि मी त्याचा सेवक आहे, ही दास्यभक्ती आहे.
८. सख्यभक्ती : परमात्मा हा माझा मित्र आहे, साथी आहे, बंधू आहे, अशा प्रकारे भक्ती करणे, याला सख्यभक्ती म्हणतात.
९. आत्मनिवेदन : ही भक्तीची सर्वोच्च पायरी आहे. यामध्ये सर्वस्वी शरण जाणे होय. आपला सर्व भार प्रभूवर टाकणे, याला आत्मनिवेदन असे म्हणतात. आत्मनिवेदन भक्ताला अशा अवस्थेत घेऊन जाते की, तेथून त्याचे सर्व विश्वच भगवन्मय होऊन जाते.
अशी ही नवविधा भक्ती आपल्याला ईश्वरापर्यंत घेऊन जाते. यातील पहिले ३ प्रकार परमेश्वराप्रती श्रद्धा उत्पन्न करण्यासाठी साहाय्यक ठरतात. पुढचे ३ हे भगवंताच्या सगुण रूपांशी संबंधित आहेत आणि शेवटचे तीन हे आंतरिक भाव आहेत. पहिल्या तिन्हीत नामाला विशेष महत्त्व आहे.
(साभार : संकेतस्थळ)
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या आणि तळमळीने अन् भावपूर्ण सेवा करणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मधु मेहता !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या साधनावृद्धी शिबिराच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
साधकांचा आधारस्तंभ असलेल्या आणि भजनांतून देवाला आळवणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या नागपूर येथील कै. (सौ.) जयश्री क्षीरसागर (वय ७१ वर्षे) !
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !