सामाजिक माध्यमांत सक्रीय राहिल्याने गोव्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक अधोगती, तर विद्यार्थिनी लैंगिक शोषणाच्या बळी ! – समूपदेशकांचे मत

राष्ट्राची युवा पिढी अशा प्रकारे व्यसने आणि अनैतिकता यांना बळी पडल्यास राष्ट्राचे रक्षण कोण करणार ? त्यामुळे ही केवळ सामाजिक समस्या न रहाता राष्ट्रीय समस्याच असल्याचे जाणून आतापासूनच उपाययोजना करायला हवी !

श्री गणेशाच्या विडंबनात्मक मूर्ती ट्विटरवर ठेवून ‘यामुळे भावना दुखावत नाहीत का ?’ असा अभिनेते प्रकाश राज यांचा प्रश्न

श्री गणेशमूर्ती मूर्तीशास्त्रानुसार योग्य रूपात सिद्ध केली, तर त्यातून चैतन्य प्रक्षेपित होऊन भाविकांना लाभ होतो. मूळ स्वरूपापेक्षा भिन्न स्वरूपातील मूर्ती सिद्ध करून त्याचा भाविकांना अपेक्षित लाभ होत नाही.

ट्विटरकडून सर्बियाच्या ७ दूतावासांची खाती तडकाफडकी बंद !

‘कोसोवा’ आणि ‘सर्बिया’ या देशांतील संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर निर्णय

विद्वेषाचे मूळ नष्ट करा !

भारताच्या विरोधात एकाने गरळओक केली, तरी कोट्यवधींनी संघटित होऊन तो आवाज दडपला पाहिजे. जेव्हा हे साध्य होईल, तेव्हा कुणीही भारतविरोधी पाऊल उचलतांना १०० वेळा विचार करील. यासाठी नागरिक आणि सरकार दोघांनीही राष्ट्रकर्तव्याचे भान ठेवून कृतीशील व्हावे !

आमीर खान यांच्यानंतर आता अभिनेते शाहरुख खान यांच्या ‘पठाण’ चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी

ट्विटरवर ‘#BoycottPathan’ हा ‘हॅशटॅग ट्रेंड’ !

हिंदु जनजागृती समितीकडून सामाजिक माध्यमांद्वारे (‘सोशल मिडिया’द्वारे) हिंदु राष्ट्राच्या विचारधारेचा प्रसार आणि त्याला मिळत असलेला अभूतपूर्व प्रतिसाद !

कोरोना महामारीच्या काळात जेव्हा प्रत्यक्ष घराबाहेर पडून धर्मप्रसार करण्यास मर्यादा आल्या, तेव्हा ‘सोशल मिडिया’द्वारे त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला.

हिंदुद्वेषी नियतकालिक ‘द वीक’ने प्रकाशित केले भगवान शंकर आणि कालीमाता यांचे अश्‍लाघ्य चित्र !

हिंदु देवतांचे विडंबन करणारी ‘द वीक’सारखी नियतकालिके कधीतरी मुसलमान किंवा ख्रिस्ती यांच्या श्रद्धास्थानांचा अनादर करतात का ? हिंदूंच्याच पैशांवर मोठ्या झालेल्या अशा नियतकालिकांवर आता हिंदूंनी बहिष्कार घालून त्यांना वठणीवर आणले पाहिजे !

सामाजिक माध्यमांच्या आधारे वनस्पतींची लागवड करतांना घ्यावयाची काळजी !

सामाजिक माध्यमांतून किंवा अन्य माध्यमांतून मिळालेल्या माहितीनुसार लागवड करत असतांना प्रथम त्यांचा संपूर्ण अभ्यास करावा. अन्यथा त्यांची लागवड केलेल्या भूमी नापिक बनण्याची शक्यता आहे, तसेच त्या वनस्पतींपासून लाभ होण्याऐवजी अधिक प्रमाणात हानीच होण्याची शक्यता आहे.’

विज्ञानाची प्रगती ?

पूर्वीच्या काळी लोक साधना करत असल्यामुळे त्यांच्यावर संस्कार होते. समाज सात्त्विक होता, त्यांना योग्य-अयोग्य याची जाण होती आणि म्हणूनच भारत महासत्ता होता. भारताला पुन्हा महासत्ता बनवायचे असेल, तर धर्मशिक्षण देऊन समाज सात्त्विक होणे आवश्यक आहे.

‘मासूम सवाल’ या हिंदी चित्रपटाच्या भित्तीपत्रकावर ‘सॅनिटरी पॅड’वर भगवान श्रीकृष्णाचे चित्र

इतक्या खालच्या स्तरावर जाऊन हिंदूंच्या देवतांचा अवमान केला जात असूनही अशांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी, त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी कठोर कायदा केला जात नाही, हे हिंदूंना लज्जास्पद !