‘मासूम सवाल’ या हिंदी चित्रपटाच्या भित्तीपत्रकावर ‘सॅनिटरी पॅड’वर भगवान श्रीकृष्णाचे चित्र

सामाजिक माध्यमांतून प्रचंड विरोध

(‘सॅनिटरी पॅड’ म्हणजे महिलांच्या मासिक पाळीच्या वेळी वापरायचे एक प्रकारचे कापड)

मुंबई – ‘मासूम सवाल’ या आगामी हिंदी चित्रपटाचे भित्तीपत्रक प्रकाशित करण्यात आले आहे. यावर ‘सॅनिटरी पॅड’ दाखवण्यात आले असून त्यावर चित्रपटांतील अभिनेत्यांसह भगवान श्रीकृष्णाचे चित्रही दाखवण्यात आले आहे. यामुळे सामाजिक माध्यमांतून याचा तीव्र विरोध केला जात आहे. यावर चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेते यांनी स्पष्टीकरण देतांना म्हटले की, याचा उद्देश कुणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता.

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)

१. चित्रपटातील अभिनेत्री एकावली खन्ना यांनी म्हटले की, मला याविषयाची माहिती नाही. जर असे झाले आहे, तर निमार्त्यांचा कुणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नसणार. चित्रपटाचा उद्देश केवळ समाजाची चुकीची धारणा दूर करण्याचा आहे. आजच्या पिढीमध्ये अंधविश्वासाला स्थान नाही, जे महिलांवर बलपूर्वक लादले जात आहे.

२. चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष उपाध्याय यांनी सांगितले की, संपूर्ण चित्रपट महिलांच्या मासिक पाळीच्या संदर्भात आहे. त्यामुळे आम्ही सॅनिटरी पॅड दाखवले आहे. प्रत्यक्षात पॅडवर भगवान श्रीकृष्णाचे चित्र नाही.

संपादकीय भूमिका

इतक्या खालच्या स्तरावर जाऊन हिंदूंच्या देवतांचा अवमान केला जात असूनही अशांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी, त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी कठोर कायदा केला जात नाही, हे हिंदूंना लज्जास्पद !