नियती मानवाला त्याच्या कर्मफलातून मुक्त करत देवाकडे सोपवत असल्याने नियती ही देवाने समस्त मानवजातीवर केलेली कृपाच आहे !

ईश्वर नियतीचे माध्यम बनवून निर्मळ प्रीतीने आणि उदात्तभावाने जिवाकडून नियमांचे काटेकोर पालन करवून घेतो. ‘ही गुरुमाऊलीचीच माया आहे’, हे कळणे साधनेविना अशक्य आहे; म्हणून मानवाला गुरुमार्ग हवा.

प.पू. दास महाराज यांनी ‘विदेही स्थिती’विषयी केलेले विवेचन !

विदेही, म्हणजे निर्विकल्प. त्याला कसलाच विकल्प नाही आणि शरीरच नाही. तो शरीर सोडून निराकार तत्त्वाकडे जातो, म्हणजे निर्विकाराकडे जातो.

ईश्वरपूर (इस्लामपूर, सांगली) येथील श्री. राजाराम भाऊ नरुटे (वय ८९ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

प्रेमभाव असलेले आणि सचोटीने वारकरी संप्रदायानुसार साधना करणारे, सतत देवाच्या अनुसंधानात असलेले, तसेच मुलाला साधनेत सर्वतोपरी साहाय्य करणारे श्री. राजाराम भाऊ नरुटे यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले.

फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती रेखाराणी वर्मा (वय ७२ वर्षे) यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे

‘एकदा वर्माकाकू मी सेवा करत असलेल्या ठिकाणी आल्या होत्या. तेव्हा मी त्यांना प्रथमच पहात होते. त्या वेळी देवाच्या कृपेने मला त्यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

श्रीविष्णुरूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जागी शिवपिंडी दिसणे, त्या वेळी ‘हरि-हर नाही भेदाभेद’ ही पंक्ती मनात येणे आणि आगामी काळात लयाशी संबंधित कार्य होणार असल्याने परात्पर गुरुदेवांनी शिवपिंडीच्या रूपात दर्शन दिल्याचे जाणवणे

‘परात्पर गुरु डॉक्टर हेच श्रीविष्णु आहेत, तेच शिव आहेत आणि तेच सर्वस्व आहेत. काळानुसार त्यांचे सूक्ष्मातील कार्य भिन्न आहे; म्हणून ते विविध रूपांत दिसतात. यापुढील काळात लयाशी संबंधित कार्य होणार असल्याने त्यांनी शिवपिंडीच्या रूपात दर्शन दिले.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी मूतखड्याच्या त्रासाच्या निवारणासाठी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

मला होत असलेल्या मूतखड्याच्या त्रासाचे निवारण होण्यासाठी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी मला ‘श्री दुर्गादेव्यै नमः । श्री दुर्गादेव्यै नमः । श्री दुर्गादेव्यै नमः । श्री दुर्गादेव्यै नमः । श्री हनुमते नमः ।’, असा नामजप करायला सांगितला होता. त्या वेळी आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथील धर्मप्रेमी श्री. किशन शर्मा यांच्या नातेवाईकांना मृत्यूत्तर सद्गती मिळावी, यासाठी ‘साधना’ विषयावरील प्रवचनाचे केले आयोजन !

हिंदु जनजागृती समितीद्वारे मनुष्य जीवनातील साधनेचे महत्त्व, ‘श्री गुरुदेव दत्त’ या नामजपाने पूर्वजांना सद्गती कशी मिळते ? आदींविषयी माहिती सांगितली गेली.

महाविनाशकारी संग्रामाचा आरंभ : जीव वाचवण्यासाठी भगवंताला शरण जाणे, हाच एकमेव पर्याय ! – प.पू. दास महाराज

रशियाने २४.०२.२०२२ या दिवशी पहाटे युक्रेनवर आक्रमण करत अखिल विश्वाला तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर प.पू. दास महाराज यांनी साधक आणि हिंदु समाज यांना केलेली विनंती अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी केलेली प्रार्थना येथे देत आहोत.

पू. नीलेश सिंगबाळ यांच्या परिवाराशी एकरूप झालेल्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या त्यांच्या गृहकृत्य साहाय्यक सुश्री (कु.) कला खेडेकर (वय ५३ वर्षे) !

९.२.२०२२ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये या सत्काराचा वृत्तांत प्रसिद्ध करण्यात आला आहे. आता श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितलेली सुश्री (कु.) कलाताई यांच्याविषयीची गुणवैशिष्ट्ये पाहू.

सनातनचे संत पू. शिवाजी वटकर यांनी स्वतःच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !

‘१९.१०.२०२१ या दिवशी माझा तिथीनुसार ७५ वा वाढदिवस साजरा झाला. त्या दिवशी मी परात्पर गुरु डॉक्टर, संत आणि साधक यांची कृपा अन् अमृतमय अन् अवर्णनीय प्रीती अनुभवली. मी ती येथे शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करत आहे.