सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी मूतखड्याच्या त्रासाच्या निवारणासाठी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘नामजपादी उपाय केल्याने आध्यात्मिक त्रास कसे दूर होतात ?’, याविषयीची लेखमाला !

सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ

मला होत असलेल्या मूतखड्याच्या त्रासाचे निवारण होण्यासाठी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी मला ‘श्री दुर्गादेव्यै नमः । श्री दुर्गादेव्यै नमः । श्री दुर्गादेव्यै नमः । श्री दुर्गादेव्यै नमः । श्री हनुमते नमः ।’, असा प्रतिदिन १ घंटा नामजप करायला सांगितला होता. त्या वेळी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

१. नामजप करतांना झालेले त्रास

अ. मूतखड्याचा त्रास होत असतांना मला उलटी आल्यासारखे वाटते आणि पोटात पुष्कळ वेदना होतात. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप करतांना मला अशाच प्रकारचे त्रास झाले.

आ. मी नामजप करत असतांना मूतखडा असलेल्या ठिकाणी मला पुष्कळ वेदना होत असत आणि तिथे टोचल्यासारखे होत असे, तसेच नामजप करतांना मला पोटात अन् लघवीच्या ठिकाणी पुष्कळ वेदना होऊन उष्णता वाढत होती.

कु. वेदिका खातू

२. त्रास न्यून होण्याच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

अ. माझा नामजप पूर्ण झाल्यावर मला होणार्‍या वेदना आणि त्रास न्यून होत असत.

आ. सद्गुरु गाडगीळकाकांना याविषयी सांगितल्यावर त्यांनी मला सांगितले, ‘‘नामजप करतांना मधून मधून पाणी पिऊ शकता.’’ त्यांनी मला पेल्यात पाणी घेऊन त्यावर हात ठेवून नामजप करायला सांगितला. त्यानंतर नामजप करतांना मी मधे मधे पाणी प्यायल्यावर मला उलटी होत नसे. अन्य वेळी पोटात दुखत असतांना मी पाणी प्यायल्यावर मला लगेच उलटी व्हायची.

इ. एकदा माझ्या पोटात पुष्कळ वेदना होत होत्या. तेव्हा मी हा नामजप रात्रभर केल्यावर माझ्या वेदना थांबल्या आणि माझी ‘सोनोग्राफी’ करायची होती, तीही रहित झाली.

– कु. वेदिका मंगेश खातू, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(१.१.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक