गुरुपौर्णिमेला २२ दिवस शिल्लक

गुरुपौर्णिमा

श्रीहरि (विष्णु), त्रिपुरारी (शिव) ही अनुक्रमे वैष्णव आणि शैव या संप्रदायांनुसार ईश्वराचीच नावे आहेत. ईश्वराचे मारक रूप काही शिकवण्यासाठी रागावले, तर त्याच वेळी ईश्वराचे तारक रूप म्हणजेच गुरु भक्ताला सांभाळून घेतात; परंतु गुरु म्हणजे तारक रूपच रागावले, तर त्यांची क्षमा मागण्यावाचून दुसरा मार्ग नसतो.