गुरुपौर्णिमेला २५ दिवस शिल्लक

गुरुकृपायोगाचे महत्त्व निरनिराळ्या योगमार्गांनी साधना करण्यात कित्येक वर्षे फुकट न घालविता, म्हणजे या सर्व मार्गांना डावलून, गुरुकृपा लवकर प्राप्त कशी करायची ते गुरुकृपायोगात साधक शिकतो. त्यामुळे साहजिकच या मार्गाने जलद उन्नती होते.

गुरुपौर्णिमेला २६ दिवस शिल्लक

बिंब-प्रतिबिंब न्यायाने शिष्याच्या मनातील, गुरूंनी काय करावे, याबद्दलच्या विचारांचे (बिंबाचे) प्रतिबिंब गुरूंच्या मनात उमटून त्यांना शिष्याचे विचार कळतात. ते विचार शिष्याच्या उन्नतीसाठी पोषक असल्यास गुरु त्यानुसार वागतात.

गुरुपौर्णिमेला २८ दिवस शिल्लक

श्री शंकराचार्यांनी म्हटले आहे, ‘‘ज्ञानदान करणाऱ्या सद्गुरूंना शोभेल अशी उपमा या त्रिभुवनात कोठेही  नाही….

गुरुपौर्णिमेला २९ दिवस शिल्लक

गुरु आतही आहेत आणि बाहेरही आहेत. तुम्ही अंतर्मुख व्हावे, अशी परिस्थिती गुरु निर्माण करतात. तुम्हाला आत्म्याकडे म्हणजेच ब्रह्माकडे ओढावे, म्हणून गुरु आतही म्हणजे हृदयात तयारी करत असतात.

gurupournima

गुरुपौर्णिमेला ३० दिवस शिल्लक

वेद, शास्त्र, स्मृती वगैरेंच्या बहुवाक्यतेचे एकवाक्यीकरण गुरुकृपेने होते. बाह्यतः  त्यांचे शब्दार्थ निराळे वाटले, तरी भावार्थ एकच कसा, हे गुरुकृपेने कळते.

गुरुपौर्णिमेला ३२ दिवस शिल्लक

संन्याशांना ज्ञानयोगाने वैराग्य येते. काही जण वैराग्य पराकोटीला गेले की, संन्यास घेतात आणि घरदार सोडून फिरतात; मात्र हा संन्यास गुरूंनी दिला असेल, तरच घरदार सोडून गेल्याचा फायदा होतो.

गुरुपौर्णिमेला ३३ दिवस शिल्लक

गंगेमुळे पाप, शशी (चंद्रा) मुळे ताप (मानसिक तणाव) आणि कल्पतरूमुळे दैन्य (दारिद्र्य) नाहीसे होते. याउलट श्री गुरुदर्शनाने पाप, ताप अन् दैन्य या तिन्ही गोष्टींचे हरण होते, म्हणजेच हे तिन्ही त्रास दूर होतात.

गुरुपौर्णिमेला ३४ दिवस शिल्लक

शिष्यांच्या भावानुसार गुरूंचे शिष्यांवर कमी-जास्त प्रेम असणे साहजिक आहे, जसे आई-वडिलांचे आपल्या मुलांवर कमी-जास्त प्रेम असते; पण चांगले आई-वडील जसे ते दर्शवत नाहीत, तसे गुरुही दर्शवत नाहीत.