सनातनचे आश्रम आणि विविध उपक्रम हे केवळ साधना करणाऱ्यांसाठी ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘मुनष्य जन्म हा साधना करून ईश्वरप्राप्ती करण्यासाठी असतो. जो या उद्देशपूर्तीसाठी कार्यरत असतो, त्याला ‘साधक’ म्हणतात. पूर्वीच्या काळी अशा साधकांची काळजी राज्यकर्ते अन् समाज घेत असत. हल्लीच्या काळात हे साधक उपेक्षित रहातात. त्यांना साहाय्य करण्यासाठी सनातन संस्था कार्यरत आहे. यामुळे सनातनचे आश्रम आणि विविध उपक्रम हे केवळ साधना करणाऱ्यांसाठीच आहेत. येथे साधनेसाठी उपयोगी ठरणारे विविध उपक्रम विनामूल्य शिकवले जातात.’ (३०.३.२०२२)