गुरुपौर्णिमेला ४६ दिवस शिल्लक
तीव्र मुमुक्षुत्व किंवा गुरुप्राप्तीची तीव्र तळमळ या एका गुणामुळे गुरुप्राप्ती लवकर होते आणि गुरुकृपा सातत्याने रहाते.
तीव्र मुमुक्षुत्व किंवा गुरुप्राप्तीची तीव्र तळमळ या एका गुणामुळे गुरुप्राप्ती लवकर होते आणि गुरुकृपा सातत्याने रहाते.
कृपा हा शब्द कृप् या धातूपासून तयार होतो. कृप् म्हणजे दया करणे आणि कृपा म्हणजे दया, करुणा, अनुग्रह किंवा प्रसाद. गुरुकृपेच्या माध्यमातून जीव शिवाशी जोडला जाणे, याला गुरुकृपायोग असे म्हणतात.
जे आपण दुसर्यास सांगतो तेच आपण आपणास सांगावे. माझे कर्तेपण मेल्याखेरीज भगवंत प्रसन्न होणार नाही. प्रत्येक कर्माच्या वेळी त्याचे स्मरण करूया.
दुर्बळ विचार आणि तुच्छ इच्छांना पायदळी तुडवा. दुःखद विचार आणि मान्यता यांचे दिवाळे काढून आत्ममस्तीचा दिवा लावा.
स्वतःच्या ‘गुरु’पणामुळे शिष्याला त्याच्या लघुपणाचा न्यूनगंड वाटू न देता, गुरु त्याचा न्यूनगंड काढून त्याला ‘गुरु’पद प्राप्त करून देतात.
आपण ज्याच्या पोटी जन्माला आलो, त्याचेच नाव आपण आपल्या नावापुढे लावतो, तसे भगवंताविषयी करावे.
गुरूंना अंतर्ज्ञानाने सर्वकाही समजते, या अनुभूतीमुळे शिष्य वाईट कृत्ये करणे बर्याचदा टाळतो.
पू. गुरुनाथ दाभोलकर (सनातनचे ४० वे संत, वय ८४ वर्षे) यांचे अनमोल विचारधन !
‘विज्ञान आणि अध्यात्म’ यांचा संगम साधून ‘राष्ट्र आणि धर्म’ यांच्या उत्कर्षासाठी झटणारे फार अल्प आहेत. अशांपैकी आपण एक बनणे, म्हणजे खर्या अर्थाने हिंदुत्व जोपासणे होय.’