निधन वार्ता

मोरेवस्ती केंद्रातील सनातनच्या साधिका सौ. शालिनी चिंचोळकर यांच्या मातोश्री सौ. रुक्मिणी मधुकर शेगोकार (वय ७७ वर्षे) यांचे ३ मे या दिवशी सायंकाळी ७.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.

सोलापूर येथे मुलाने डोक्यात गॅस सिलेंडर फेकून मारल्याने आईचा मृत्यू

नशेमध्ये आपण काय करत आहोत याचे भान न राहिल्याने मनुष्य किती टोकाचे पाऊल उचलतो. कोणत्याही व्यसनाच्या आहारी न जाण्यासाठी साधना आणि धर्मशिक्षण घेणे आवश्यक आहे, हेच या उदाहरणावरुन स्पष्ट होते !

पुणे मार्केट यार्डमधील १२ अडत्यांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई

शहरातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर मार्केटयार्डमधील गर्दी कमी करण्यासाठी समितीच्या वतीने फळ विभागातील संबंधित अडत्यांवर दंडात्मक कारवाई करत २० सहस्र ६० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

 नागठाणे (जिल्हा सातारा) कोरोनाबाधिताची आत्महत्या

कोरोनाच्या आपदेत मनोबल वाढण्यासाठी साधनेला पर्याय नाही !

सातार्‍यातील १ सहस्र ७९४ रास्त भाव धान्य दुकानदार संपावर !

कोरोनाच्या आपत्काळात संपावर जाणे कितपत योग्य आहे ?

रायगड जिल्ह्यातील लसीकरण केंद्रावर २०० मीटर परिसरामध्ये संचारबंदी लागू !

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रातील लसीकरण केंद्राच्या २०० मीटर परिसरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहे.

जालना येथे ट्रकची धडक बसून रुग्णालयातून पळून जाणारा कोरोनाबाधित रुग्ण ठार !

येथील कोरोना ‘पॉझिटिव्ह’ असलेले रुग्ण राजू गायकवाड (वय ४८ वर्षे) सामान्य रुग्णालयातून कुणालाही न सांगता बाहेर पडले. ते रस्त्यावरून जात असतांना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्यांना धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या नेरूळ औद्योगिक वसाहतीतील आस्थापनांवर दंडात्मक कारवाई !

कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या शिवाजीनगर औद्योगिक भागातील (नेरूळ) ३ आस्थापनांवर नेरूळ विभागाचे साहाय्यक आयुक्त दत्तात्रय नागरे यांनी कारवाई केली. त्यांच्याकडून ६४ सहस्र इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे.

धंदा होत नसल्याने नगरपालिकेने १ वर्षाचे भाडे माफ करावे !

गेल्या वर्षभरापासून शहरातील एकमेव चौपाटी असलेली मोतीबाग बंद आहे. त्यामुळे तेथील व्यावसायिकांचे धंदे बंद आहेत. अशा परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे अवघड झाले असतांना ‘नगरपालिकेचे भाडे कसे भरायचे ?’, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे.