कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने आयोजित आरोग्य शिबिरात १२५ पत्रकारांची आरोग्य पडताळणी !
पूरकाळात आघाडीवर काम करणार्या पत्रकारांसाठी ७ ऑगस्टला ‘कोल्हापूर प्रेस क्लब’ येथे आरोग्य पडताळणी शिबिर घेण्यात आले.
मालगाव (जिल्हा सातारा) येथील २ मद्यसाठ्यांवर पोलिसांच्या धाडी !
मालगाव येथील बसडेपोच्या बाजूला मद्य विक्री करणारे विक्रम राजेंद्र आवळे यांच्यावर कारवाई करत ८४० रुपयांच्या १४ देशी मद्याच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
३ कोटी रुपयांच्या सोने चोरी प्रकरणी सातारा येथील ४ जण पोलिसांच्या कह्यात !
केरळ येथील एका अधिकोषातील ३ कोटी रुपयांचे सोने चोरी केल्याच्या प्रकरणी नाशिक येथील मुख्य संशयित आरोपीसह त्याच्या सातारा येथील ३ सहकार्यांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे.
पुणे येथील श्रावणामध्ये होणारी मंगलमूर्तीची द्वारयात्रा रहित
चिंचवड देवस्थानच्या वतीने परंपरेनुसार, तसेच प्रतिवर्षीप्रमाणे श्रावणामध्ये होणारी मंगलमूर्तीची द्वारयात्रा या वर्षी ९ ते १२ ऑगस्ट या कालावधीमध्ये संपन्न होणार होती; परंतु अजूनही कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे.
यवतमाळ जिल्ह्यात कापसावर गुलाबी बोंडअळीचे संकट !
कापसाचे बोंडे सिद्ध होण्यापूर्वीच बोंडअळी आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
पुणे येथे गुंडांकडून सातत्याने वाहनांची जाळपोळ, दगडफेक आणि तोडफोड !
म्हातोबादरा येथील रिक्शा आणि दुचाकी ७ ऑगस्टच्या पहाटे जाळण्यात आली. म्हातोबादरा येथे गुंडांकडून सातत्याने वाहनांची जाळपोळ, दगडफेक, तोडफोड असे प्रकार चालू असतात.
पुणे-बेंगळुरू महामार्गावर सातारा जिल्हा सीमेत खड्डेचखड्डे !
रस्त्यावर परत परत खड्डे का पडतात, याचे मूळ कारण शोधणे अपेक्षित आहे, तसेच त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना काढावी.
उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्याकडून किल्ले अजिंक्यतार्याच्या पायथ्याची पहाणी
अभियंता चिद्रे यांना विविध सूचना देत संकटकाळात नागरिकांना पालिकेकडून संपूर्ण सहकार्य मिळेल, असे आश्वासन शेंडे यांनी नागरिकांना दिले.
‘नेट पॅक रिचार्ज’साठी पैसे नसल्याने सातार्यात दीड सहस्र विद्यार्थ्यांची शैक्षणिक अडचण !
कोरोनामुळे त्यांच्या रोजगारावर परिणाम झाला असून दोन वेळचे पोटभर अन्नही मिळेनासे झाले आहे, तर भ्रमणभाष आणि ‘नेट पॅक’ कोठून आणणार ?, असा प्रश्न पालकांसमोर आहे.