
सोलापूर – चारित्र्यावर संशय घेणे, बुरखा घालण्यास आणि नमाजपठण करण्यास सक्ती करणे, तसेच बळजोरीने गोमांस खाण्यास भाग पाडून शारीरिक अन् मानसिक छळ केल्याच्या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी ऐश्वर्या दत्ता गायकवाड (लग्नानंतरचे नाव आयेशा इम्रान पठाण) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती इम्रान शौकत पठाण याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. (धर्मांधांची विकृत मनोवृत्तीची अनेक उदाहरणे उघड होऊनही हिंदु महिला त्यांच्याशी विवाह करतात, हे धर्मशिक्षणाच्या अभावाचे लक्षण ! – संपादक)
तक्रारदार ऐश्वर्या गायकवाड या घरीच सौंदर्यवर्धनाचा व्यवसाय करतात. त्यांचा पहिला विवाह वर्ष २०१७ मध्ये झाला होता; मात्र कौटुंबिक वादांमुळे त्या पतीपासून विभक्त होऊन आईकडे रहात होत्या. त्यानंतर त्यांची ओळख इम्रान पठाण याच्याशी झाली आणि त्यांनी विवाह केला. विवाहानंतर काही दिवसांतच पतीने त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन घराबाहेर जाण्यावर निर्बंध घालण्यासह इस्लामी धार्मिक प्रथा पाळण्यास सक्ती करणे आणि विविध प्रकारे छळ केला, असे आरोप करण्यात आले आहेत. त्यांना २ मुली असून ‘मुलगाच हवा’ या कारणावरूनही छळ करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
गोव्यात अवैध खाणकाम : साळगावकर समूह आणि संबंधित आस्थापनांची अनुमाने १ सहस्र २३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
थोडक्यात महत्त्वाचे ( दि : २२.०६.२०२६ )
विशाल अग्रवालचा जामीन रहित करण्यासाठी पुणे पोलीस न्यायालयात अर्ज देणार !
आजारांना दूर ठेवण्यासाठी ‘योग’ हा रामबाण उपाय ! – मुख्यमंत्री फडणवीस
पंढरपूर विकासासाठी ३ सहस्र ९९३ कोटी रुपयांच्या महाआराखड्यास प्रशासकीय मान्यता !
‘ऑनलाईन फूड डिलिव्हरी’चे काम करणार्या धर्मांधाला वाकड (पुणे) येथे अमली पदार्थांची विक्री करतांना अटक !