
पुणे, ८ ऑगस्ट – येथील चिंचवड देवस्थानच्या वतीने परंपरेनुसार, तसेच प्रतिवर्षीप्रमाणे श्रावणामध्ये होणारी मंगलमूर्तीची द्वारयात्रा या वर्षी ९ ते १२ ऑगस्ट या कालावधीमध्ये संपन्न होणार होती; परंतु अजूनही कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. पुणे जिल्ह्यातील नियमांमध्ये शिथिलता दिलेली नाही. त्यामुळे शासनाच्या नियमानुसार असलेल्या जमावबंदी, तसेच इतर निर्बंधांमुळे या वर्षी ही द्वारयात्रा होणार नाही, भाविकांनी आणि संबंधितांनी याची नोंद घ्यावी, अशी माहिती चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण ! – सुभाष शिरोडकर, मंत्री
युवतीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयाने ग्रामस्थांनी एका शिक्षकाला चोपले !
इयत्ता १० वीच्या परीक्षेतील कॉपी प्रकरणाचे मुख्य सूत्रधार मुख्याध्यापकच
गडकर आळी (सातारा) येथील महिलांनी घातला अधिकार्यांना घेराव !
कचरा प्रक्रिया सक्तीविरोधात ‘हाऊसिंग सोसायटी फेडरेशन’ आक्रमक
पिंपरी-चिंचवड येथे यंदा पावसाळ्यात अनुमाने ५ लाख देशी झाडांची लागवड !