कोंढवा (सातारा) येथे ८ दिवसांपासून गढूळ पाणीपुरवठा !

 शुद्ध पाण्यासाठी ग्रामस्थांची मागणी !

ग्रामस्थांना अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून शुद्ध पाणीपुरवठा का करत नाही ?

गढूळ पाणीपुरवठा

सातारा, ८ ऑगस्ट (वार्ता.) – कोंढवे गावात कोट्यवधी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना चालू करण्यात आली आहे. तरीही ग्रामस्थांना पुरेसा, शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरलेल्या ग्रामपंचायतीकडून गत ८ दिवसांपासून गढूळ पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यामध्ये आमदार आणि खासदार यांनी लक्ष घालावे, तसेच कोंढवे ग्रामपंचायतीला जिल्हा प्रशासनाने समज देऊन ग्रामस्थांना शुद्ध, पुरेसा आणि नियमित पाणीपुरवठा करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.