उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्याकडून किल्ले अजिंक्यतार्‍याच्या पायथ्याची पहाणी

किल्ले अजिंक्यतार्‍याच्या पायथ्याची पहाणी करताना उपनगराध्यक्ष मनोज शेंडे (डावीकडे)

सातारा, ७ ऑगस्ट (वार्ता.) – सातारा जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे २२ जुलैपासून पासून पूरस्थिती निर्माण झाली. शहरातील किल्ले अजिंक्यतार्‍याच्या पायथ्याला असलेल्या नागरी वस्तींवर दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, अभियंता दिलीप चिद्र यांनी विविध ठिकाणची पहाणी नुकतीच केली.

किल्ले अजिंक्यतार्‍याच्या पायथ्याशी असणार्‍या माची पेठ, केसरकर पेठ, पॉवर हाऊस झोपडपट्टी, बोगदा या परिसराला दरड कोसळण्याचा धोका अधिक आहे. वर्ष २०१७ मध्ये केसरकर पेठेतील एका घरावर दरड कोसळली होती. बोगदा परिसरातही दरड कोसळली होती. आता झालेल्या अतीवृष्टीमुळे शहरात कुठे धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे का, याची पहाणी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी पालिकेच्या वतीने केली. या वेळी शेंडे यांनी माची पेठ, केसरकर पेठ, पॉवर हाऊस झोपडपट्टी, बोगदा परिसरातील नागरिकांशी चर्चा करून माहिती घेतली. अभियंता चिद्रे यांना विविध सूचना देत संकटकाळात नागरिकांना पालिकेकडून संपूर्ण सहकार्य मिळेल, असे आश्‍वासन शेंडे यांनी नागरिकांना दिले.