लागवडीच्या संदर्भातील कृतींच्या लिखित नोंदी ठेवाव्यात !

‘लागवडीतील प्रत्येक कृतीच्या लिखित नोंदी ठेवल्यास त्याचा पुष्कळ लाभ होतो. बियाणी पेरल्याचा दिनांक आणि उगवण चालू झाल्याचा दिनांक यांची नोंद ठेवावी; तसेच रोपवाटिकेतून एखादे नवीन रोप आणल्यास त्याच्याही दिनांकाची नोंद ठेवावी.

देशी बियाणी साठवून स्‍वावलंबी होऊया !

भावी भीषण आपत्‍काळापूर्वी आपण देशी वाणांची (बियाण्‍यांची) साठवणूक आणि संवर्धन करण्‍यास आरंभ केला, तर बियाण्‍यांच्‍या संदर्भात स्‍वावलंबी झाल्‍याने पुष्‍कळ लाभ होऊ शकतो.

लागवड करतांना ‘अनुभव हाच आपला गुरु आहे’, हे लक्षात घ्‍या !

वातावरणात होणारे पालट आणि त्‍यांचा झाडांवर होणारा परिणाम, यांतील बारकावे प्रत्‍येक ऋतूत निरनिराळे असतात. हे सर्व समजण्‍यासाठी काही काळ सातत्‍याने आणि चिकाटीने लागवडीचे प्रयत्न चालू ठेवावेत.

देशी बियाणी लावावीत !

‘आज अधिक उत्पन्न मिळण्यासाठी विविध प्रकारच्या प्रक्रिया करून सिद्ध केलेली ‘हायब्रीड’ बियाणी पेठेत सहज उपलब्ध आहेत; परंतु या बियाण्यांच्या उपयोगाने होणार्‍या लाभांपेक्षा होणारी हानी पुष्कळ गंभीर आहे. देशी बियाण्यांपासून मिळणारा भाजीपाला आरोग्यास लाभदायक आणि चवीलाही अधिक चांगला असतो.

प्रत्‍येक कुंडीत किंवा वाफ्‍यात पालापाचोळ्‍याचे आच्‍छादन करावे !

‘पालापाचोळ्‍याच्‍या आच्‍छादनामुळे मातीचा पृष्‍ठभाग झाकला जातो. तो झाकल्‍याने पुष्‍कळ लाभ होतात. ‘आच्‍छादन करणे (भूमी झाकणे)’, हा नैसर्गिक शेतीतील महत्त्वाचा स्‍तंभ आहे.

लागवडीतील सुकलेली रोपे आणि वेली यांचा आच्‍छादनासाठी उपयोग करावा !

आपल्‍या लागवडीतील सुकलेले प्रत्‍येक रोप किंवा वेलीची एकही काडी टाकून न देता त्‍याचा पुनर्वापर करावा. हे सर्व अवशेष कुजून झाडांना जीवनद्रव्‍ये उपलब्‍ध करून देतात.

लागवडीमध्‍ये भाजीपाल्‍याच्‍या समवेत फुलझाडेही असणे आवश्‍यक आहे !

आपल्‍या घरच्‍या लागवडीमध्‍ये फळे आणि भाजीपाला यांच्‍या समवेत फुलझाडांचीही लागवड करणे आवश्‍यक आहे. फुलझाडे लागवडीची शोभा वाढवतात.

बियांवर बीजामृताचे संस्‍कार का करावेत ?

‘बिया पेरण्‍यापूर्वी त्‍यांवर बीजसंस्‍कार करणे आवश्‍यक असते. बीजसंस्‍कार करण्‍यासाठी बीजामृताचा उपयोग करतात. बीजसंस्‍कारांमुळे पुढील लाभ होतात.

रासायनिक शेती केवळ मानवी आरोग्याची नाही, तर निसर्गाचीही मोठी हानी करते !

‘रासायनिक शेतीतील पिके मानवी आरोग्यासाठी हानीकारक आहेतच; परंतु ही रसायने शेतातील अनेक सूक्ष्म जीव-जंतू, पाणी आणि हवा यांचीही हानी करतात. रसायनांच्या सततच्या वापराने मातीतील उपयुक्त सूक्ष्म जीवाणू मरतात आणि भूमीची सुपीकता घटत जाऊन ती नापीक होते.

वेलवर्गीय भाज्यांसाठी मोठ्या आकाराची कुंडी किंवा वाफा अधिक योग्य !

सर्व वेल जसे वरच्या दिशेने पसरतात, तशी त्यांची मुळे भूमीखाली पुष्कळ प्रमाणात आडवी पसरतात. त्यामुळे लहान आकाराच्या कुंडीत वेलवर्गीय भाज्यांची वाढ चांगली होऊ शकत नाही.