रोपांवर जीवामृत आणि ताक यांची एकत्रित फवारणी करण्‍याचे लाभ

जीवामृत आणि आंबट ताक मिसळून त्‍याची सर्व रोपांवर फवारणी करावी. फवारणीसाठी तुषार सिंचनाच्‍या (स्‍प्रेच्‍या) बाटलीचा उपयोग करावा. या फवारणीमुळे होणारे लाभ देत आहोत . . .

लागवडीच्या कामांत घरातील सर्वांचा सहभाग असावा !

असे केल्याने ‘एखादी भाजी ताटात येण्याआधी ती कशी लावली जाते ? ती किती कालावधीने सिद्ध होते ?’, असे अनेक बारकावे सर्वांच्या लक्षात येतात. सर्वांनी कष्ट करून पिकवलेला भाजीपाला खातांना निराळेच समाधान मिळते.

वेलवर्गीय भाज्‍यांची उत्तम वाढ होण्‍याकरता वेलीसाठी मांडव करावा !

वेलवर्गीय भाज्‍या लावल्‍यावर त्‍यांची उत्तम वाढ होण्‍यासाठी वेल उंचावर चढवणे आवश्‍यक असते. मांडव केल्‍यास वेल व्‍यवस्‍थित पसरून तिला अनेक फांद्या येतात आणि परिणामी अधिक उत्‍पन्‍न मिळते.

रोपांवर अल्‍प प्रमाणात लागलेली कीड केवळ पाण्‍याच्‍या फवार्‍याने धुवून घालवावी !

‘रोपांवर मावा, पांढरी माशी अशा किडींचा संसर्ग अल्‍प प्रमाणात असतांनाच पाण्‍याच्‍या फवार्‍याने रोपाचा तो भाग धुवून टाकावा. यासाठी तुषार सिंचनाच्‍या (‘स्‍प्रे’च्‍या) बाटलीचा उपयोग करावा. मावा अगदीच चिकट असेल, तर दात घासण्‍याच्‍या जुन्‍या ब्रशने (टूथ ब्रशने) घासून तो काढून टाकावा.

कुंडीतील मुंग्‍या घालवण्‍याचा सोपा उपाय !

मुंग्‍या हा निसर्गाच्‍या अन्‍नसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे, हे लक्षात घेऊन शक्‍यतो विषारी औषधे घालून त्‍यांना मारू नये. हळद, कापूर, दालचिनी यांपैकी जी पूड घरात उपलब्‍ध असेल, ती साधारण १ – २ चहाचे चमचे कुंडीत आणि कुंडीखाली पसरून घालावी. या पदार्थांच्‍या उग्र वासाने मुंग्‍या निघून जातात.

प्रतिदिन स्‍वयंपाकात फोडणी करतांना लागणारे घटक स्‍वतःच्‍या लागवडीत पिकवा !

प्रतिदिन स्‍वयंपाकघरात फोडणीसाठी लागणार्‍या मिरच्‍या, कढीपत्ता यांची रोपे कुंडीत सहज लावता येतात…..

रसायनांच्‍या फवारण्‍यांचे आरोग्‍यावर होणारे दुष्‍परिणाम

रासायनिक फवारणी केलेली फळे, तसेच भाज्‍या कितीही धुतल्‍या, तरी त्‍या रसायनांचे विषारी परिणाम नष्‍ट होत नाहीत. त्‍यामुळे ‘स्‍वतः विषमुक्‍त अन्‍न पिकवणे’ किंवा ‘विषमुक्‍त शेती करणारे विश्‍वासू शेतकरी शोधून त्‍यांच्‍याकडून भाजीपाला विकत घेणे’, हेच पर्याय शिल्लक रहातात.

उन्‍हाच्‍या आवश्‍यकतेचा विचार करून कुंड्यांची रचना करा !

निरनिराळ्‍या रोपांना असलेली उन्‍हाची आवश्‍यकता लक्षात घेऊन कुंड्यांची रचना केल्‍यास ते अधिक लाभदायक होऊ शकते.

अनेक समस्‍यांवर औषध असलेल्‍या नागवेलीची (विड्याच्‍या पानांच्‍या वेलीची) लागवड कशी करावी ?

प्रत्‍येक घरात जसे तुळशीचे रोप असते, तशीच नागवेलही असायला हवी. केवळ खाण्‍यासाठीच नव्‍हे, तर आपल्‍या प्रत्‍येक धार्मिक सण-समारंभामध्‍ये विड्याच्‍या पानांची आवश्‍यकता असते

पुदिना लागवड कधी करावी ?

‘फेब्रुवारी ते एप्रिल हा पुदिना लागवडीसाठी उत्तम कालावधी ! पावसाळ्‍यातही याची लागवड करता येते. बियाण्‍यांच्‍या दुकानात पुदिन्‍याच्‍या बिया मिळतात; परंतु घरगुती लागवडीसाठी याच्‍या काड्यांपासून लागवड करणे अधिक सोपे जाते. हे अल्‍प व्‍ययातही होते.