आनंदमात्र स्थिती हीच आत्मस्थिती !
‘आनंद स्वरूपाची अभिलाषा हेच भक्ती-ज्ञान आणि वैराग्य होय. यालाच ‘ध्यानयोग’ म्हणतात. ही आनंद स्वरूपाची एकमेव अनुभूतीच असावी. आनंद अनुभवाविना कोणत्याही वृत्तीचा उद्गम होऊ न देणे, हेच आत्मानात्मविवेकाचे कार्य आहे.
‘आनंद स्वरूपाची अभिलाषा हेच भक्ती-ज्ञान आणि वैराग्य होय. यालाच ‘ध्यानयोग’ म्हणतात. ही आनंद स्वरूपाची एकमेव अनुभूतीच असावी. आनंद अनुभवाविना कोणत्याही वृत्तीचा उद्गम होऊ न देणे, हेच आत्मानात्मविवेकाचे कार्य आहे.
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना जिज्ञासा नसल्याने ते स्वतःला आहे तेवढ्या छोट्याशा ज्ञानात (अज्ञानात) रहातात. त्यांना पुढचे पुढचे काहीच कळत नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘पूर्वी लोकांना वाटायचे, ‘हिंदु राष्ट्र’ हे स्वप्न आहे. ‘हिंदु राष्ट्र’ कधीही स्थापन होणार नाही’; परंतु आता पुष्कळ लोकांना वाटते, ‘हिंदु राष्ट्राची स्थापना निश्चितच होईल.’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
शहामृगाला जेव्हा कळते की, आता संकट येणार आहे, तेव्हा ते वाळूत डोके खुपसून बसते. त्याला वाटते की, संकट निघून जाईल; पण तसे न होता ते संकट त्याचाच नाश करते. आपल्या सर्वांची स्थिती तशी होऊ नये, यासाठी आता साधना करण्याविना पर्याय नाही !
‘आपण देवाचे भक्त बनलो की, देव आपत्काळातही आपल्या तोंडात सोन्याचा चमचा ठेवतो, म्हणजेच तो आपल्याला आपत्काळाची झळ लागू देत नाही !’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ
‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात मी साहाय्य करीन’, असा दृष्टीकोन नको, तर ‘हे माझेच कार्य आहे’, असा दृष्टीकोन हवा ! तसा दृष्टीकोन असल्यास कार्य चांगले होते आणि स्वतःचीही प्रगती होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
विनाश पावणारी वस्तू केव्हाही सुखदायी असत नाही; म्हणून ते चेतनस्वरूप प्राप्त करून घेणे, हेच सुखाचे साध्य आणि तोच दुःख निवारणाचा उपाय होय.
‘कुठे पृथ्वीवर राज्य करण्याचे ध्येय असणारे काही पंथ, तर कुठे ‘प्रत्येकाला ईश्वरप्राप्ती व्हावी’, हे ध्येय असणारा महान हिंदु धर्म !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
भगवंताचे नाम हे बँकेत ठेवलेल्या पैशांप्रमाणेच आहे. वेळप्रसंगी ते खास उपयोगी पडते.