परिस्थिती चिंताजनक असल्याने उपचार निवडीच्या पर्यायात वेळ दवडू नका ! – सौ. किशोरी पेडणेकर

या वेळी त्या म्हणाल्या, ‘‘ रेल्वेचे २ सहस्र ८०० बेड्स सिद्ध आहेत. वरळी येथे ‘एन्.आय्.सी.ए.’मध्ये खाटा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कांजूरमार्ग येथे अडीच सहस्रपर्यंत खाटा सिद्ध करत आहोत.

रेमडेसिविर इंजेक्शनच्या व्ययाला पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीने संमती नाकारली !

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनामुळे अनेक रुग्ण गंभीर स्थितीत असतांना महापालिका प्रशासनाने रेमडेसिविर इंजेक्शनची केलेली खरेदी स्थायी समितीने ‘वेटिंग’वर ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.

सातारा जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा !

कोरोनाशी दोन हात करतांना लसीच्या तुटवड्यासमवेत आता जिल्ह्यातील रक्तपेढीलाही विविध रक्तगटांच्या रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी आता पुढे येऊन रक्तदान करण्याची आवश्यकता भासू लागली आहे.

नगर येथे एकाचवेळी २२ मृतदेहांवर अंत्यसंस्कार, तर एकाच शववाहिकेत कोंबले अनेक मृतदेह !

दिवसाला येथे २ सहस्रांवर नवे रुग्ण आढळून येत असून उपचार चालू असलेल्या रुग्णांची संख्या १२ सहस्रांच्या घरात गेली आहे. आतापर्यंत १ सहस्र २७० जणांचा मृत्यू झाला आहे.

शासनाचे ‘जम्बो कोविड सेंटर्स’ खासगी रुग्णालयांनी दत्तक घ्यावेत ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘कोविड सेंटर्स’ मध्ये खासगी रुग्णालयातील डॉक्टर आल्यास उपचारासाठी साहाय्य होईल. महाराष्ट्र एकवटल्यावर तो जिंकतो. यामध्ये तुम्ही महत्त्वाचा दुवा आहात, असे खासगी रुग्णालयाच्या प्रतिनिधींना उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्य सरकारकडून कोरोनाशी संबंधित चाचण्यांच्या दरात कपात !

कोरोना महामारी संकटाच्या काळात नागरिकांना अशाप्रकारे लुबाडणार्‍या प्रयोगशाळा, रुग्णालये आणि कोरोना सेंटर यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.

सिंधुदुर्गात कोरोनाचे ९२ नवीन रुग्ण

नियमांचे पालन करून दुकाने चालू ठेवण्याची अनुमती मिळावी, यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे मागणीचे निवेदन सादर

कोरोनाच्या विरोधातील लसीकरण वाढवण्यासाठी गोव्यात ११ एप्रिल ते २० एप्रिल ‘टीका उत्सव’ मोहीम राबवणार !  डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

‘टीका उत्सव’ मोहिमेचा कालावधी ३० एप्रिलपर्यंतही वाढवण्याचे संकेत

ऑक्सिजनचा १०० टक्के पुरवठा वैद्यकीय क्षेत्राला देण्याचा राज्यशासनाचा आदेश !- राजेंद्र शिंगणे, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री

‘रेमडेसिविर’ आणि ऑक्सिजन यांचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी येत आहेत.

पुणे येथे शासनाच्या निर्णयाविरोधात आंदोलन करणार्‍या व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद राका यांच्यासह ५० ते ६० व्यापार्‍यांवर गुन्हे नोंद !

व्यापार्‍यांना दुकाने उघडण्यासाठी अनुमती द्यावी, या मागणीसाठी ८ एप्रिल या दिवशी व्यापार्‍यांनी लक्ष्मी रस्त्यावर आंदोलन केले होते.