कोल्हापूर जिल्ह्यातील डेल्टा प्लसचे सातही रुग्ण पूर्णत: बरे झाले ! – डॉ. योगेश साळे, आरोग्याधिकारी

डेल्टा प्लसच्या रुग्णांच्या रहिवास परिसरात सध्या एकाही रुग्ण नसल्याने नागरिकांनी भीती बाळगू नये

कर्करोगाच्या रुग्णांनी अधिक प्रमाणात शेंगदाणे सेवन केल्यास संपूर्ण शरिरात कर्करोग पसरण्याचा धोका वाढू शकतो ! – संशोधकांचा दावा

संशोधकांच्या मते, ज्या कर्करोगाच्या रुग्णांनी एका दिवसामध्ये २५० ग्रॅम शेंगदाणे सेवन केले, त्यांना अधिक प्रमाणात धोका दिसून आला.

मुंबईत मैदाने, उद्याने, चौपाट्या, समुद्रकिनारे सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत खुली !

मुंबईत काही दिवसांपासून रुग्णवाढ आणि मृत्यूदर यांत घट झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली असल्याने महापालिकेच्या प्रशासनाने वरील निर्णय घेतला आहे. सामान्यांसाठी मुंबई लोकल चालू करण्यात आली आहे.

राज्यात कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ रुग्णांची संख्या ६६ वर पोचली !

जळगाव येथे १३, रत्नागिरी १२, मुंबई ११, ठाणे आणि पुणे येथे प्रत्येकी ६, पालघर अन् रायगड येथे प्रत्येकी ३, नांदेड अन् गोंदिया येथे प्रत्येकी २, तर चंद्रपूर, अकोला, सिंधुदुर्ग, सांगली, नंदुरबार, संभाजीनगर, कोल्हापूर आणि बीड येथे प्रत्येकी १ रुग्ण आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे १०१ नवीन रुग्ण आढळले

जिल्ह्यात १६ ऑगस्ट या दिवशी कोरोनाचे १०१ नवीन रुग्ण आढळले, तर एकही मृत्यू नाही. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ सहस्र २९८ झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनामुळे चौघांचा मृत्यू

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४९ सहस्र ९४७ झाली आहे.

सातारा शहरामध्ये डेंग्यूचे प्रमाण वाढले !

पावसाचे पाणी साठून राहिल्यामुळे डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. आरोग्य विभागाकडून साथीच्या आजाराने आजारी असल्याचा अहवाल जिल्हा हिवताप कार्यालयाकडे आला आहे.

कोरोनासुर आणि काळ !

सध्या भारतात सर्वांच्याच तोंडी सर्वाधिक वेळा येणारा आणि एकमेव असा शब्द म्हणजे ‘कोरोना’ ! काही जण कोरोनाच्या संसर्गाकडे गांभीर्याने पहातात, तर काही जण ‘कोरोना वगैरे सगळे थोतांड आहे, कोरोना अस्तित्वातच नाही’, असेही म्हणत बेफिकीर रहातात…..

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे ८४ नवीन रुग्ण : ५ जणांचा मृत्यू   

कोरोनाचे ८४ नवीन रुग्ण आढळले, तर ५ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ सहस्र २७८ झाली आहे.