जिंद (हरियाणा) येथे ५० अल्पवयीन विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करणार्‍या मुख्याध्यापकाला अटक !

शिक्षकांकडूनच असे कृत्य होत असतील, तर पालकांनी विश्‍वास कुणावर ठेवायचा ? अशांना फाशीचीच शिक्षा दिल्यावर इतरांवर वचक बसेल !

सनातन धर्माच्या होत असलेल्या अवमानाचा निषेध करणे, ही भक्ती !

सध्या हिंदु देवता आणि सनातन धर्म यांचा उघडपणे अपमान केला जातो. त्याचा सनदशीर मार्गाने निषेध करणे, ही भक्ती आहे. आज रामराज्याची स्थापना करण्यासाठी प्रत्येकाने धर्मासाठी १ घंटा देण्याची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले.

केरळ उच्च न्यायालयाच्या फटाक्यांवरील बंदीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार केरळ सरकार !

केरळ उच्च न्यायालयाने फटाक्यांवर लावलेल्या बंदीच्या विरोधात राज्यातील मंदिरांचे व्यवस्थापन पहाणारे सरकारी देवस्वम् बोर्ड आणि न्यास पुढे अपील करण्याचा विचार करत आहेत.

महाराष्ट्रातील प्रमुख ४० मंदिरांना वार्षिक १ सहस्र कोटी रुपयांचे दान !

सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये घोटाळे झालेले आहेत. हे रोखण्यासाठी मंदिरे सरकारच्या कह्यातून मुक्त होण्यासाठी हिंदूंनी प्रयत्न करणे आवश्यक ! 

जम्मू-काश्मीर पोलीस जामिनावर असलेल्या आतंकवाद्यांच्या पायावर जी.पी.एस्. यंत्र लावून लक्ष ठेवणार !

आतंकवाद्यांवर वेसण घालण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा कितीही वापर केला, तरी आतंकवादी त्याच्यावरही मात करून आतंकवादी कारवाया करतात, हे अनेक घटनांतून सिद्ध झाले आहे. त्यामुळे तंत्रज्ञानासह आतंकवाद्यांच्या विरोधात कठोर धोरण नेहमीच अवलंबणे आवश्यक आहे !

(म्हणे) ‘१९ नोव्हेंबरला विमानातून प्रवास करणार्‍यांच्या जिवाला धोका असेल !’ – खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू

अमेरिकेत राहून अशा प्रकारच्या धमक्या देऊन प्रसिद्धीत रहाणार्‍या पन्नूला भारताच्या कह्यात देण्याची मागणी अमेरिकेकडे का केली जात नाही ?

Jaishankar Diplomacy : भारत-कॅनडा वाद सोडवण्यासाठी अजूनही कूटनैतिक चर्चेला वाव ! – परराष्ट्र मंत्री डॉ. एस्. जयशंकर

भारत आणि कॅनडा यांच्यातील वाद सोडवण्यासाठी अजूनही कूटनैतिक चर्चेला वाव आहे. सार्वभौमत्व आणि संवेदनशीलता केवळ एका बाजूने असून चालत नाही. दोन्ही देश एकमेकांच्या संपर्कात असून यावर योग्य उपाय काढण्यात येईल, अशी आशा आहे, असे वक्तव्य भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी केले.

जगातील तथाकथित नेते गाझातील नरसंहाराचे समर्थन करत आहेत  ! – प्रियांका गांधी, सरचिटणीस, काँग्रेस

‘जगभरातील इस्लामी नेते इस्रायलच्या दीड सहस्र नागरिकांच्या हत्यांविषयी, हमासने पकडलेल्या ओलिसांविषयी मौन बाळगून का आहेत ?’, असे प्रियांका गांधी का विचारत नाहीत ?

देहली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर !

चांगल्या गोष्टींसाठी नाही, तर वाईट गोष्टींसाठीच भारताची राजधानी सर्वांत पुढे असते, हे लज्जास्पद ! याला सर्वपक्षीय शासनकर्ते, प्रशासन आणि जनता उत्तरदायी आहे !

इस्रोचे अध्यक्ष एस्. सोमनाथ यांनी स्थगित केले आत्मचरित्राचे प्रकाशन !

इस्रोचे अध्यक्ष ए. सोमनाथ यांचे ‘निलावू कुडीचा सिंहगल’ (चंद्र प्यायलेला सिंह) हे मल्याळम् भाषेतील आत्मचरित्र पुढच्या आठवड्यात प्रकाशित होणार होते; मात्र हे प्रकाशन त्यांनी स्थगित केले आहे.