अमेरिकेच्या एफ्.बी.आय.चे महासंचालक भारत दौर्‍यावर !

यातून अमेरिका भारताचा कधीही मित्र होऊ शकत नाही, हे स्पष्ट होते ! अशा अमेरिकेसमवेत कसे व्यवहार करायचे ?, हे भारताने ठरवणे आवश्यक आहे !

आमिषांना बळी पडून हिंदु धर्माचा त्याग करू नका ! – अभिनेत्री मालविका अविनाश

लव्ह जिहादमुळे आपला धर्म त्यागून इस्लाममध्ये धर्मांतरित होणार्‍या तरुणींनी प्रथम, ‘आपण काय काय गमावून बसलो आहोत ?’, याचा विचार केला पाहिजे. ‘आमिषांना बळी पडून हिंदु धर्माचा त्याग करू नका’, असे आवाहन अभिनेत्री आणि भाजपच्या नेत्या मालविका अविनाश यांनी केले.

Shoes Hurled at Kerala CM : केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांच्या वाहन ताफ्यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फेकली चप्पल !

अहिंसावादी काँग्रेसची हिंसात्मक कृती !

राज्यसभेतील खासदारांसाठीचा शुक्रवारच्या नमाजासाठीचा अर्धा घंटा रहित !

मुळात धर्मनिरपेक्ष देशात असा वेळ का देण्यात आला होता ?, हा प्रश्‍न आहे !

छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदी विष्णुदेव साय यांची निवड

५९ वर्षीय आदिवासी नेते विष्णुदेव साय यांनी कुनकुरी (अनुसूचित जमातीसाठी राखीव) विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. त्यांनी छत्तीसगडचे प्रदेशाध्यक्षपद भूषवलेले आहे. त्यानंतर वर्ष २०१४ ते २०१९ या काळात ते केंद्रशासनात मंत्री होते.

गौरी लंकेश हत्येच्या प्रकरणातील आरोपी मोहन नायक यांना जामीन संमत

गौरी लंकेश हत्या प्रकरणातील ११ वे आरोपी मोहन नायक यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने ७ डिसेंबर या दिवशी जामीन संमत केला.

जलद गती विशेष न्यायालयांमध्ये ‘पोक्सो’ची २ लाख ४३ सहस्र प्रकरणे प्रलंबित

जलद गती न्यायालयांतील केवळ एका कायद्याच्या संदर्भात इतकी प्रकरणे प्रलंबित असतील, तर अन्य प्रकरणांच्या प्रलंबित खटल्यांची कल्पनाच करता येत नाही. जलद गती न्यायालयांची ही स्थिती असेल, तर भारतात तत्परतेने न्याय मिळणे  कठीण आहे, हेच लक्षात येते !

Death Threat : पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना जिवे मारण्याची धमकी देणार्‍याला अटक

बागेश्‍वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली होती. गुंड लॉरेन्स बिश्‍नोई याच्या नावाने ई-मेल पाठवून पंडित धीरेंद्रकृष्ण त्यांच्याकडे १० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती.

३ आरोपी पोलिसांच्या कह्यात

श्री राष्ट्रीय रजपूत करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंह गोगामेडी यांच्यावर प्रत्यक्ष गोळीबार करणारा रोहित राठोड आणि नितीन फौजी यांच्यासह उद्धम नावाच्या तिसर्‍या व्यक्तीलाही पोलिसांनी कह्यात घेतले.