डॉ. मोहन यादव यांची मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी निवड

जगदीश देवडा आणि राजेश शुक्ला उपमुख्यमंत्री होणार

डॉ. मोहन यादव

भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून भाजपकडून डॉ. मोहन यादव यांची निवड करण्यात आली आहे. यासह जगदीश देवडा आणि राजेश शुक्ला यांची उपमुख्यमंत्री पदासाठी निवड करण्यात आली आहे. माजी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांना विधानसभेचे अध्यक्ष बनवण्यात येणार आहे. डॉ. मोहन यादव सध्या राज्याचे शिक्षणमंत्री होते. त्यांनी भाजपची विद्यार्थी शाखा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून राजकारणाला प्रारंभ केला.