अन्नाच्या संदर्भातील वाईट शक्तींचे वर्चस्व दर्शवणारी लक्षणे !

अन्नाच्या संदर्भातील वाईट शक्तींकडून व्यक्तीला होणार्‍या त्रासाची काही लक्षणे येथे दिली आहेत. यावरून सात्त्विक आहाराचे महत्त्व लक्षात येईल !

‘विळीवर बसून भाजी चिरावी’, असे का सांगितले आहे ?

विळीवर उजवा गुडघा वर घेऊन बसण्याच्या होणार्‍या मुद्रेतून जिवाच्या रजोगुणी विचारांच्या वेगावरही नियंत्रण राहून भाजी चिरणे, ही प्रक्रिया कुठल्याही त्रासदायक स्पंदनांची निर्मिती होण्यापासून मुक्त रहाते.

विद्यार्थ्यांना शाळेत जेवणाच्या डब्यातून घरी बनवलेले पदार्थ आणण्यास सांगणे !

बाहेरचे पदार्थ खाण्याने आपले विचार बिघडतात.’ मुलांना हे पटले. तेव्हापासून सर्व मुले घरचा डबा आणतात आणि ‘माझ्या आईने बनवले आहे’, असे सांगून मला आनंदाने देतात.

घास घेतांना पाचही बोटांचा वापर का करावा ?

तळहातातून बोटांत नेहमी ईश्‍वरी शक्तीच्या प्रवाहाचे प्रक्षेपण होत असते. बोटांद्वारे अन्न ग्रहण करतांना बोटांचा तोंडाला स्पर्श होतो. जिवाला ईश्‍वरी शक्तीचा लाभ होतो आणि हाताची बोटेही ईश्‍वरी शक्तीने भारित होतात.

तमोगुणी ‘फास्ट फूड’ !

‘फास्ट फूड’ बाह्यतः चवीला चटपटीत लागत असले, तरी तो तमोगुणी आहार असल्याने त्याचे शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक दुष्परिणाम होतात.

वाळवलेले आणि दळलेले धान्य सात्त्विक का असते ?

‘पाखडण्याच्या प्रक्रियेतून सूक्ष्म स्तरावर धान्याचे पूर्ण शुद्धीकरण होत नसल्याने पूर्वी असे धान्य धुऊन ते वाळवून जात्यात दळण्याची पद्धत होती.

बाहेरचे पदार्थ खाण्याची वेळ आल्यास काय करावे ?

बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने वाईट शक्ती खाण्यातून आक्रमण करू शकतात. हे आक्रमण वा त्रास होऊ नये; म्हणून बाहेर खातांना ते पदार्थ ईश्‍वराला अर्पण करून आणि प्रार्थना अन् नामजप करत खावेत.

जेवणात भात नसल्यास चुकल्यासारखे का वाटते ?

इतर धान्यांच्या तुलनेत तांदळात सर्वाधिक सात्त्विकता आहे. तसेच तांदूळ हे लवकर पोट भरण्याचे साधन असल्याने जेवणात भात किंवा तांदळाची भाकरी नसल्यास बहिर्मुखता असलेल्या जिवांनाही अन्नग्रहणातील उणीव जाणवते.

भारतातील आतंकवादाचे प्रकार आणि त्यांवरील उपाययोजना !

भारताला आतंकवादाचा धोका अजूनही कायम असल्याने सतत सतर्क रहाणे आवश्यक !…

पलूस (जिल्हा सांगली) येथील ‘डेडिकेटेड कोविड (सशुल्क) कक्ष’ येथे कोरोनावर उपचार घेतांना आलेले चांगले अनुभव

‘डेडिकेटेड कोविड (सशुल्क) कक्ष’चा आदर्श अन्य रुग्णालयांनी घ्यायला हवा ! – संपादक