बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या वेळी विरोधी पक्षांची तोंडे बंद होती !  

पंतप्रधान मोदी यांची विरोधी पक्षांच्या बैठकीवर टीका

कॅनडात खलिस्तान्यांनी फलकावर लिहिले पंतप्रधान मोदी ‘आतंकवादी’ !

कॅनडा आता ‘खलिस्तानी देश’ झाला असून तेथील हिंदु आणि त्यांची धार्मिक स्थळे असुरक्षित झाली आहेत. याविषयी आता भारताने कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे !

‘लोकमान्य टिळक’ पुरस्कार देण्यावरून वाद निर्माण !

‘लोकमान्य टिळक’ राष्ट्रीय पुरस्कार मोदींना देण्यास काँग्रेस, सेवा दल, इंटक या संघटना, तसेच आम आदमी पक्ष आणि युवक क्रांती दलाने विरोध दर्शवला आहे.

अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग ! – अमेरिका

अमेरिका चीनला सर्वांत मोठा शत्रू मानते. अलीकडच्या काळात भारत काही प्रमाणात चीनच्या विरोधात आक्रमक धोरण अवलंबत आहे. त्यामुळेच एरव्ही भारताला पाण्यात पहाणारी अमेरिका अशी वक्तव्ये करून भारताला स्वतःच्या बाजूने करण्याचा प्रयत्न करत आहे !  

‘चंद्रयान-३’चे यशस्वी प्रक्षेपण !

हे यान आता २३ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास चंद्रावर उतरणार असल्याची माहिती इस्रोच्या शास्त्रज्ञांकडून देण्यात आली. यापूर्वी वर्ष २०१९ मध्ये ‘चंद्रयान-२’ चंद्रावर उतरण्यास अपयशी ठरले होते. त्यानंतर पुन्हा एकदा ‘इस्रो’ने ‘चंद्रयान-३’चे प्रक्षेपण केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान पुरस्कार प्रदान

हा सन्मान मिळवणारे मोदी ठरले पहिले भारतीय पंतप्रधान !

सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश स्थायी सदस्य देशांमध्ये नसतांना संयुक्त राष्ट्रे जगाचे प्रतिनिधित्व कसे करू शकतात ? – पंतप्रधान नरेंद्र मोदी

सध्याचे स्थायी सदस्य देश जगाचे वास्तविक प्रतिनिधी आहेत का, हा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे. ज्या उद्देशाने त्यांना स्थायी सदस्य म्हणून स्थापित करण्यात आले, त्याची पूर्तता करण्यासाठी आज ते सक्षम आहेत का ? जगभरातील देशांच्या दृष्टीकोनातून संयुक्त राष्ट्र संघटनेचे महत्त्व राहिले आहे का ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘लोकमान्‍य टिळक’ राष्‍ट्रीय पुरस्‍कार घोषित !

‘लोकमान्‍य टिळक स्‍मारक ट्रस्‍ट’च्‍या वतीने देण्‍यात येणारा ‘लोकमान्‍य टिळक’ राष्‍ट्रीय पुरस्‍कार या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घोषित झाला आहे. ‘टिळक स्‍मारक ट्रस्‍ट’चे विश्‍वस्‍त डॉ. रोहित टिळक यांनी १० जुलै या दिवशी झालेल्‍या पत्रकार परिषदेत या पुरस्‍काराची घोषणा केली.

(म्हणे) ‘भारतातील ख्रिस्ती धर्माला संपवता येईल, असा कुणी विचार करू नये !’ – आर्चबिशप क्लेमिस, केरळ

भारतातील ख्रिस्ती धर्माला संपवण्याविषयी कुणी काही बोलत नसतांना आणि काही करत नसतांना अशा प्रकारचे विधान करून हिंदूंना ‘तालिबानी’ ठरवण्याचाच पाद्य्रांचा हा प्रयत्न आहे, हे लक्षात घ्या !

पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना ठार मारण्याचे विधान करणार्‍या मौलानावर कायदेशीर कारवाई करा !

अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना स्वतःला हे समजत कसे नाही ?