मुंबई, ५ ऑगस्ट – राज कुंद्रा यांच्या अश्लील (पॉर्न) चित्रपट बनवण्याच्या प्रकरणात गोव्यातील ३ ‘मॉडेल्स’चा सहभाग आढळल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पोलिसांनी त्यांची नावे उघड केलेली नसली, तरी यातील एक ‘मॉडेल’ फोंडा येथील, दुसरी मडगाव आणि तिसरी पर्वरी भागांतील असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मुंबई पोलीस या तिन्ही ‘मॉडेल्स’ना जबानी नोंदवण्यासाठी पुढील आठवड्यात मुंबई येथे येण्यासाठी ‘समन्स’ पाठवू शकते. पोलिसांच्या मते या तिन्ही महिला ‘मॉडेल्स’ गतवर्षी मुंबई येथील चित्रपटसृष्टीत काम करत होत्या आणि चालू वर्षी मार्चमध्ये या तिन्ही ‘मॉडेल्स’ गोव्यात परतल्या आहेत. राज कुंद्रा यांच्याशी निगडित वादग्रस्त ‘हॉटशॉट ॲप’चे विविध निर्माते आणि छायाचित्रकार यांनी या तिन्ही ‘मॉडेल्स’चे चित्रीकरण केलेले आहे. निर्मात्यांच्या विरोधात नोंदवण्यात आलेल्या ‘प्रथमदर्शनी अहवाला’मध्ये या तिन्ही ‘मॉडेल्स’ची नावे आहेत.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > राज कुंद्रा यांच्या अश्लील (पॉर्न) चित्रपट बनवण्याच्या प्रकरणात गोव्यातील ३ ‘मॉडेल्स’चा सहभाग
राज कुंद्रा यांच्या अश्लील (पॉर्न) चित्रपट बनवण्याच्या प्रकरणात गोव्यातील ३ ‘मॉडेल्स’चा सहभाग
नूतन लेख
- ‘कीबोर्ड’च्या ‘स्ट्रोक’वरून भ्रमणभाषमधील ‘बँकिंग’ आणि ‘सोशल मीडिया पासवर्ड’ चोरण्याची नवीन पद्धत !
- बेस्टच्या किमान आणि वातानुकूलित गाड्यांच्या तिकिट दरात वाढ !
- अमित शहा यांचा बनावट व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी काँग्रेसच्या सोशल मिडिया चालवणार्यांवर गुन्हा !
- सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून संचलन
- देशहितासाठी महाराष्ट्राला आणखी बळकट करून पुढे न्यावे लागेल ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
- Narendra Modi In Pune : मोदी आतंकवाद्यांना घरात घुसून मारणार !