आमदारांच्या अपात्रतेविषयी निर्णय घेण्यापूर्वी म्हणणे मांडण्याची संधी देऊ ! – राहुल नार्वेकर, अध्यक्ष, विधानसभा

सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांत हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वावर सगळ्यांना त्यांचे म्हणणे मांडायची संधी देऊ.

प्रत्येक समाजातील नागरिकांनी शांतता राखण्यासाठी सहकार्य करावे ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात सर्व जातीपातीचे लोक रहातात. कायदा आणि सुव्यवस्था राखणे, हे प्रशासनाचे दायित्व आहे; मात्र यासाठी सर्व नागरिकांनीही सहकार्य करावे.

कोकण रेल्वे मार्गावर ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ लवकरच धावणार !

लवकरच कोकण रेल्वे मार्गावरून ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ धावणार आहे. तिची चाचणी १६ मे या दिवशी घेण्यात आली. वर्ष २०२३ पर्यंत ७५ वन्दे भारत एक्सप्रेस चालू होणार आहेत.

आषाढी एकादशीनिमित्त ५ सहस्र विशेष बस सोडणार ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आषाढी एकादशीच्या निमित्ताने एस्.टी. महामंडळाच्या वतीने ५ सहस्र विशेष बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्या २५ जून ते ५ जुलै या कालावधीत धावणार आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कर्नाटकचे उदाहरण देऊन देश जिंकल्याचे सांगत आहेत ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

कर्नाटकमधील पराभवानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे, ‘‘कर्नाटकात कोणतेच सरकार परत येत नाही. वर्ष २०१८ मध्ये भाजपच्या १०६ जागा निवडून येत ३६ टक्के मत मिळाली होती.

खार (मुंबई) येथे आग लागून ६ घायाळ

येथील पश्चिम भागातील खारदांडा कोळीवाडा परिसरात सकाळी पावणेनऊच्या सुमारास एका घरात वायूगळतीमुळे आग लागून ६ जण भाजले.

देशभक्त असल्याची शिक्षा मिळत आहे !

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एन्.सी.बी.) माजी विभागीय संचालक समीर वानखडे यांच्याशी संबंधित २९ ठिकाणांवर धाड टाकली आहे.

न्हावा शेवा बंदरात २४ कोटींच्या परदेशी सिगारेट पकडल्या !

न्हावा शेवा बंदरातून २४ कोटींच्या परदेशी सिगारेट जप्त करण्यात आल्या असून ५ जणांना महसूल गुप्त वार्ता संचालनालयाच्या (डी.आर्.आय.च्या) अधिकार्‍यांनी अटक केली आहे.

अंमलबजावणी संचालनालयाकडून जयंत पाटील यांना दुसर्‍यांदा समन्स !

पाटील यांना २२ मे या दिवशी चौकशीसाठी कार्यालयात उपस्थित रहाण्याचा आदेश अंमलबजावणी संचालनालयाकडून देण्यात आला आहे.

मुंबईतील कोस्टल रोडला ‘छत्रपती संभाजी महाराजां’चे नाव देणार !

छत्रपती संभाजी महाराज यांची १४ मे या दिवशी ३६६ वी जयंती महाराष्ट्रात साजरी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर कोस्टल रोडला ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांचे नाव देण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे