मुंबई – वाढत्या मौखिक आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत मौखिक आरोग्यासाठी ‘ओरल हेल्थ पॉलिसी’ आणण्यासाठी शासन सकारात्मक असून लवकरच यासंदर्भात नवीन धोरण सिद्ध करण्यात येणार आहे. स्वच्छ मुख अभियानासाठी सदिच्छादूत म्हणून भारतरत्न सचिन तेंडलुकर यांच्यासमवेत सांमजस्य करार कार्यक्रमाप्रसंगी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन बोलत होते.
या वेळी महाजन म्हणाले, ‘‘२० मार्चपासून राज्यभरात या अभियानाचा आरंभ करून विशेषतः मुख कर्करोगावर जनजागृतीद्वारे नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत सर्व वयोगटांतील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाधीनेचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे.’’