उद्या इयत्ता दहावीचा निकाल !

मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार २ जून या दिवशी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. २ जूनला दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना निकाल पहाता येईल. mahahsscboard.in वर निकाल ऑनलाईन पाहता येईल. यासह mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरही निकाल उपलब्ध असेल.

दहावीचा निकाल पहाण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे

१. http://www.mahresult.nic.in
२. http://sscresult.mkcl.org
३. https://ssc.mahresults.org.in

राज्य शिक्षण मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ सहस्र २५६ विद्यार्थी बसले होते. त्यात ८ लाख ४४ सहस्र ११६ मुले आणि ७ सहस्र ३३ सहस्र ६७ मुली यांचा समावेश होता. राज्यभरातील ५ सहस्र ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती.