गणेशोत्सवापर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे एका बाजूचे चौपदरीकरण पूर्ण करा !

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे संथगतीने चालू असलेल्या कामाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

आमच्‍या देवतांना शिव्‍या घालून खिल्ली उडवणारे शिवसेनेचा चेहरा कसा होऊ शकतात ? – प्रा. मनीषा कायंदे, आमदार

काँग्रेसमधून काही जण येतात आणि मग ते आम्‍हालाच काहीतरी शिकवतात. ते सहन होत नव्‍हते. मी वयाच्‍या २५ व्‍या वर्षापासून शिवसेनेची मतदार आहे. पूर्वी भाजपात असले, तरी विचारांनी शिवसैनिक आहे.

(म्हणे), ‘मुंब्रा येथील धर्मांतराचे आरोप सिद्ध करा, अन्यथा क्षमा मागा !’ – राष्ट्रवादी काँग्रेस

भ्रमणभाषमधील ‘ऑनलाईन गेमिंग’द्वारे धर्मांतर केल्याचा धक्कादायक प्रकार उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथे उघडकीस आला. या प्रकरणाचे धागेदोरे मुंब्रा येथील प्रकरणाशी जोडले जात आहे. मुंब्रा येथे ४०० जणांचे धर्मांतर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

कुणालाही भावना दुखावण्याचा अधिकार नाही ! – केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

‘आदिपुरुष’ चित्रपटातील संवाद पालटण्याचे आश्‍वासन लेखक आणि दिग्दर्शक यांनी दिले आहे. केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने चित्रपटाला प्रमाणपत्र दिले आहे.

मुंबईत हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा खेळ बंद पाडला !

हिंदु संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहामध्ये घोषणा देत प्रेक्षकांना बाहेर काढले. या वेळी हिंदुत्वनिष्ठांचा कर्मचार्‍याशी वाद झाला.

पाण्याअभावी कोयना वीज प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर !

कोयना धरणातील पाण्याची पातळी सध्या खालावलेली आहे. यामुळे कोयना वीज प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर आहे. कोळकेवाडी येथील चौथ्या टप्प्यातील वीजनिर्मिती पूर्णपणे ठप्प झाली असून येत्या काही दिवसांत पाऊस न झाल्यास पहिल्या, दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्याची वीजनिर्मितीही बंद होण्याच्या मार्गावर आहे.

ज्‍येष्‍ठ शिवसैनिक विजय गावकर यांचे निधन

शिवसेनेचे परळचे पहिले शाखाप्रमुख आणि माजी नगरसेवक विजय गावकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७९ वर्षाचे होते. त्‍यांच्‍या पार्थिवावर भोईवाडा स्‍मशानभूमीत अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले. या वेळी परळ, शिवडी, लालबाग भागातील अनेक ज्‍येष्‍ठ शिवसैनिक उपस्‍थित होते.

आत्‍मघाती धर्मनिरपेक्षता जाणा !

कांदिवली (मुंबई) येथील ‘कपोल विद्यानिधी’ या शाळेत एका शिक्षिकेने ध्‍वनीक्षेपकावर प्रार्थनेनंतर अजान लावल्‍याचा प्रकार १६ जून या दिवशी घडला. या संदर्भात शिवसेनेने पोलीस ठाण्‍यात तक्रार केली आहे.

राज ठाकरे यांना वाढदिवसाला कार्यकर्त्‍यांकडून अनोखी भेट !

महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे अध्‍यक्ष राज ठाकरे यांना १४ जून या दिवशी त्‍यांच्‍या वाढदिवसानिमित्त एका कार्यकर्त्‍याने चक्‍क औरंगजेब अन् मशिदीवरील भोंग्‍याचे चित्र आणि त्‍यावर फुली मारलेला केक भेट दिला.

आज ‘नो हॉँकिंग डे’ पाळा !

ध्‍वनीप्रदूषणामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्‍य यांची हानी होत असल्‍याने पोलिसांनी हॉर्न (भोंगा) न वाजवता या उपक्रमाला सकारात्‍मक प्रतिसाद देण्‍याचे आवाहन करण्‍यात आले आहे.