महाराष्‍ट्र शासन आणणार स्‍वकीय आणि सुलभ २२ सहस्र २५१ मराठी शब्‍दांचा नवीन शब्‍दकोश !

शब्‍दकोश करण्‍यासमवेतच सर्वांनीच दैनंदिन व्‍यवहारामध्‍ये मराठी शब्‍दांचा वापर अधिकाधिक केला, तर मराठी भाषाशुद्धीची चळवळ जोर पकडेल !

अजित पवार यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट !

या वेळी त्‍यांच्‍यासमवेत राष्‍ट्रवादी काँग्रेसचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते प्रफुल्ल पटेल, राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि सुनील तटकरे उपस्‍थित होते. या भेटीत महायुतीच्‍या पुढच्‍या धोरणाविषयी चर्चा झाल्‍याचे बोलले जात आहे.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे, असे मुंबईत लावले फलक !

शहरात काही ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्‍यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र यावे, असे फलक लावण्‍यात आले आहेत. हे फलक नेमके कुणी लावले ? हे अद्याप स्‍पष्‍ट झालेले नाही.

कोट्यवधी रुपये थकवणार्‍या क्रिकेट मंडळांची बंदोबस्त शुल्काची थकबाकी सरकारकडून माफ !

क्रिकेटचे सामने ही काही जीवनावश्यक गोष्ट नसून ते करमणुकीचे माध्यम आहे. यातून मिळणार्‍या महसूलामुळे सरकारच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. असे असतांना सरकारने शुल्क अल्प करण्याचा घेतलेला निर्णय अनाकलनीय आहे !

भ्रष्टाचाराचा आरोप करत ठाकरे गटाचा मुंबई महापालिकेवर मोर्चा !

महागनरपालिकेच्या कारभारामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली १ जुलै या दिवशी मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला.

(म्‍हणे) ‘समान नागरी कायदा झाल्‍यास परिणामांचा करणार अभ्‍यास !’

देशात समान नागरी कायदा लागू होण्‍याच्‍या शक्‍यतेवरून कायदा लागू झाल्‍यास होणार्‍या परिणामांच्‍या अभ्‍यासासाठी महाराष्‍ट्र काँग्रेसने समिती गठीत केली आहे.

मुंबईत धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग !

वासनांधांपासून महिलांना स्वत:चे रक्षण करता येण्यासाठी आता सरकारनेच महिलांना स्वसंरक्षण प्रशिक्षण दिले पाहिजे. यासह वासनांधांवर वचक बसेल अशी कारवाई केली पाहिजे !

पाकिस्‍तानने पकडलेल्‍या मासेमारांच्‍या कुटुंबियांना अर्थसाहाय्‍य !

भारताची सागरी सीमा ओलांडून पाकिस्‍तानच्‍या सागरी सीमेत गेल्‍यामुळे पाकिस्‍तानने पकडलेल्‍या महाराष्‍ट्रातील मासेमारांच्‍या कुटुंबियांना दरमासाला ३०० रुपये आर्थिक साहाय्‍य करण्‍याचा निर्णय महाराष्‍ट्र शासनाने घेतला आहे.

मराठवाडा मुक्‍तीसंग्राम स्‍मारकासाठी शासनाकडून १०० कोटी रुपयांची तरतूद !

मराठवाडा मुक्‍तीसंग्रामाच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षानिमित्त मराठवाड्यातील आठही जिल्‍ह्यांमध्‍ये यानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले असून यासाठी प्रत्‍येक जिल्‍ह्यासाठी ५० लाख रुपयांचे प्रावधान करण्‍यात आले आहे.

‘महात्‍मा फुले जन आरोग्‍य योजने’च्‍या लाभधारकांना राज्‍यशासन देणार ओळखपत्र !

राज्‍यातील २ कोटी लाभधारकांना ओळखपत्र देण्‍यात येणार आहे. महात्‍मा फुले जन आरोग्‍य योजनेच्‍या अंतर्गत दीड लाख रुपयांवरून ५ लाख रुपये अर्थसाहाय्‍य करण्‍याचा निर्णय २८ जून या दिवशी मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत घेण्‍यात आला.