अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात धार्मिक ग्रंथांच्या खरेदीकडे वाचकांचा सर्वाधिक कल !

धार्मिक प्रकाशन संस्थेच्या कक्षावर ग्रंथ खरेदीसाठी वाचकांची गर्दी

नाशिक, ६ डिसेंबर (वार्ता.) – ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विविध प्रकाशकांचे विविध प्रकारच्या पुस्तकांचे विक्रीकक्ष उभारण्यात आले होते. या ठिकाणी पुस्तकांचे एकूण २०५ विक्रीकक्ष उभारण्यात आले होते. त्यामध्ये ऐतिहासिक, वैज्ञानिक, बालसाहित्य आदी विविध ग्रंथ विक्रीसाठी होते. यामध्ये धार्मिक ग्रंथांच्या कक्षावर कायमच सर्वाधिक गर्दी होती. धार्मिक ग्रंथ खरेदी करण्याकडे वाचकांचा सर्वाधिक कल दिसून येत होता.