सनातनची ग्रंथमालिका : कर्मयोग (कर्माच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती)

कर्म अटळ आहे. जिवंत रहाण्यासाठीसुद्धा श्वास घेण्याचे कर्म करावेच लागते. कर्मामुळे मनुष्य जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकतो. असे असतांनाही ‘या चक्रातून सुटायचे कसे’, हे कर्मयोग सांगतो. कर्मयोग प्रत्यक्षात कसा आचरणात आणायचा, याचे सुबोध मार्गदर्शन करणारी ग्रंथमालिका !

दीपावलीचे महत्त्व

‘दिवाळी’ हा शब्द ‘दीपावली’ या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप + आवली (रांग, ओळ) असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ. दिवाळीला सर्वत्र दिवे लावतात.

लक्ष्मीपूजन

‘प्रातःकाळी मंगलस्नान करून देवपूजा, दुपारी पार्वणश्राद्ध, ब्राह्मणभोजन आणि प्रदोषकाळी लतापल्लवांनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, श्रीविष्णु इत्यादी देवता आणि कुबेर यांची पूजा, असा या दिवसाचा विधी आहे.

शस्त्रे आणि उपकरणे यांचे पूजन !

या दिवशी राजे आणि सामंत, सरदार आपापली शस्त्रे अन् उपकरणे स्वच्छता करून ती ओळीने मांडतात अन् त्यांची पूजा करतात. त्याचप्रमाणे शेतकरी आणि कारागीर हे आपापली आऊते आणि हत्यारे यांची पूजा करतात.

शक्तीची निर्मिती, विविध नावे आणि देवीच्या उपासनेची वैशिष्ट्ये

सध्या चालू असलेल्या नवरात्रीच्या निमित्ताने देवीविषयीची शास्त्रोक्त माहिती…

ग्रंथमालिका : देवतांची उपासना आणि तिच्यामागील शास्त्र

देवतेची वैशिष्ट्ये आणि कार्ये कळल्याने देवतेचे माहात्म्य उमगते. देवतेच्या उपासनेमागील शास्त्र कळल्याने देवतेच्या उपासनेविषयी श्रद्धा अधिक वाढते. श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण होते आणि भावपूर्ण उपासना अधिक फलदायी ठरते. यासाठी देवतांची वैशिष्ट्ये, कार्ये आणि उपासना सांगणारी ही ग्रंथमालिका वाचा !

‘श्री सद्गुरुमहिमा’ या सनातनच्या ग्रंथमालिकेतील द्वितीय खंड प्रकाशित !

श्री. भांडकाकांनी लिहिलेला प्रस्तुत ग्रंथ, म्हणजे त्यांच्या गुरूंप्रती असलेल्या भावाने ओथंबलेला अमृतघटच आहे !

गोपीभाव (गोपींचा श्रीकृष्णाप्रतीचा भाव)

गोपींचा श्रीकृष्णाप्रती अनन्यसाधारण भाव होता. असाच गोपीभाव सनातनच्या काही साधिकांमध्येही आहे. गोपीभावाचे दर्शन घडवणारी ही ग्रंथमालिका म्हणजे द्वापरयुगच जणू पुन्हा अवतरल्याची प्रचीती ! ही ग्रंथमालिका वाचा आणि गोपींप्रमाणे श्रीकृष्णभक्त होण्याचा प्रयत्न करा !

भगवंताचे भावपूर्ण अनुसंधान साधून देणारे नाम !

दैनंदिन प्रपंचात व्यग्र असणाऱ्या सर्वसामान्य सांसारिकांना आचरण्यास सुलभ असा, शुचिर्भूतता, स्थळकाळ आदी बंधनविरहित असा अन् भगवंताशी सतत अनुसंधान साधून देईल, अर्थात् साधना अखंड चालू राहील असा एकमेव साधनामार्ग म्हणजे नामयोग !