‘श्री सद्गुरुमहिमा’ या सनातनच्या ग्रंथमालिकेतील द्वितीय खंड प्रकाशित !

श्री. अशोक भांड यांचा साधनाप्रवास

प.पू. भक्तराज महाराज यांचे इंदूर येथील भक्त श्री. अशोक भांड यांनी लिहिलेल्या ‘श्री सद्गुरुमहिमा’ या ग्रंथमालिकेतील ‘खंड १ – श्री अनंतानंद साईश यांचे शिष्योत्तम प.पू. भक्तराज महाराज व प.पू. रामानंद महाराज’ हा ग्रंथ यापूर्वीच प्रसिद्ध झाला आहे. त्यांनी लिहिलेला ‘खंड २ – श्री. अशोक भांड यांचा साधनाप्रवास’ हा ग्रंथ १३.७.२०२२ या दिवशी म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या प्रकाशित करण्यात आला आहे.

श्री. भांड यांना शालेय जीवनापासूनच ‘गुरु’ म्हणून प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांचा सहवास लाभला अन् त्यांची सेवा करण्याचे भाग्यही लाभले. या दोन्ही सद्गुरूंचा लाभलेला सत्संग, त्यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन, त्यांची प्रत्येक कृती आणि त्यांनी दिलेल्या अनुभूती यांतून श्री. भांड यांना ‘अध्यात्म म्हणजे काय ?’ आणि ‘प्रपंच साधून परमार्थ कसा करावा ?’, हे शिकायला मिळाले. अशा श्री. भांडकाकांनी लिहिलेला प्रस्तुत ग्रंथ, म्हणजे त्यांच्या गुरूंप्रती असलेल्या भावाने ओथंबलेला अमृतघटच आहे !

प्रस्तुत ग्रंथात हे वाचा !
लेखक आणि भक्त : श्री. अशोक काशीनाथ भांड

प्रस्तुत ग्रंथात हे वाचा !

♦ प.पू. रामानंद महाराज यांच्या सहवासात राहून श्री. अशोक भांड यांच्यात झालेले पालट आणि त्यांना आलेल्या अनुभूती
♦ श्री. अशोक भांड यांनी प.पू. रामानंद महाराज यांच्या समवेत अनुभवलेल्या गुरुपौर्णिमा, केलेल्या विविध सेवा आणि त्यांना आलेल्या अनुभूती
♦ श्री. भांड यांना प.पू. बाबा (प.पू. भक्तराज महाराज) आणि प.पू. रामानंद महाराज हे खरोखरच ईश्वरतुल्य संत असल्याची अनुभूती येणे
♦ रुग्णाईत असतांना श्री. अशोक भांड यांनी अनुभवलेले प.पू. रामानंद महाराज यांचे प्रेम !
♦ श्री. अशोक भांड यांना गुरुमंत्र मिळणे
♦ परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या आजारपणात प.पू. रामानंद महाराज यांनी त्यांची काळजी घेणे आणि त्यांना आश्वस्त करणे
♦ श्री. अशोक भांड यांना दुःखद घटनांमध्ये गुरुकृपेने स्थिर रहाता येणे
♦ प.पू. रामानंद महाराज यांनी ‘प.पू. बाबांचे समाधी मंदिर’ बांधण्याचा संकल्प हाती घेणे आणि त्या वास्तूला साकार रूप देणे
♦ प.पू. रामानंद महाराज यांचे महानिर्वाण
♦ श्री. अशोक भांड यांची प.पू. भक्तराज महाराज यांच्या कालखंडातील साधना

_______________________________

सनातनची ग्रंथसंपदा ‘ऑनलाईन’ खरेदी करा !

सनातनच्या विक्रीकेंद्रांवर आणि वितरकांकडे उपलब्ध असलेले ग्रंथ आता SanatanShop.com वरही उपलब्ध !
विशिष्ट मूल्याच्या खरेदीवर विनामूल्य घरपोच सेवा !