हाऊसिंग बोर्ड, मडगाव येथील श्री घोगळेश्वर मंदिराच्या समोर ईदच्या निमित्ताने अनधिकृतपणे कमान उभारण्याला स्थानिक हिंदूंचा विरोध

अशा प्रकारे मुद्दामहून हिंदूंची कळ काढणार्‍या धर्मांधांचा उद्दामपणा यातून दिसून येतो. धर्मांधांना विरोध करणार्‍या स्थानिक नागरिकांचे अभिनंदन ! ‘हा बांगलादेश किंवा पाकिस्तान नाही, हिंदुस्थान आहे’, असे हिंदूंनी धर्मांधांना ठणकावून सांगावे !

पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात

मडगाव, १९ ऑक्टोबर (वार्ता.) – हाऊसिंग बोर्ड, मडगाव येथील श्री घोगळेश्वर मंदिराच्या समोर ईदच्या निमित्ताने अनधिकृतपणे कमान उभारल्याने तणाव निर्माण झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने हा तणाव निवळला.

मुसलमानांचा ‘ईद-ए-मिलाद’ हा सण १८ ऑक्टोबर या दिवशी साजरा झाला. या पार्श्वभूमीवर श्री घोगळेश्वर मंदिराच्या समोर मुसलमानांनी अनधिकृतपणे कमान उभारली. देवस्थान समिती आणि स्थानिक नागरिक यांनी या कमानीला विरोध दर्शवला. या वेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. तणाव निर्माण झाल्याची माहिती मिळताच फातोर्डा पोलीस ठाण्याचे निरीक्षक कपिल नायक यांनी पोलीस कर्मचार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. या वेळी स्थानिक म्हणाले, ‘‘मंदिराच्या समोर यापूर्वी कधीही अशा प्रकारे दुसर्‍या धर्माच्या सणाच्या वेळी कमान उभारण्यात आलेली नाही. हे मंदिर ५० वर्षांहून अधिक जुने आहे आणि मंदिराच्या आजबाजूची घरे हल्ली उभारण्यात आली आहेत. त्यामुळे यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.’’

त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. या वेळी स्थानिकांनी ‘भारत माता की जय’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा वियज असो’, अशा घोषणा दिल्या. नागरिक घटनास्थळावरून गेल्यानंतरही पोलिसांकडून परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला होता.