गोव्यात २० नोव्हेंबरपासून ५२ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, ३०० चित्रपट प्रदर्शित होणार

पणजी –  गोव्यात २० ते २८ नोव्हेंबर या काळात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार आहे. महोत्सवात जगभरातील सुमारे ३०० चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. कोरोना महामारीमुळे हा महोत्सव चित्रपटाचे प्रत्यक्ष प्रदर्शन आणि ‘ऑनलाईन’ स्वरूपात प्रदर्शन या पद्धतीने (‘हायब्रीड’ पद्धतीने) होणार आहे. महोत्सवासाठी महनीय व्यक्ती आणि प्रसारमाध्यमे यांनी नोंदणी करण्यास प्रारंभ केला आहे.