भारतातील निवडणुकांची लज्‍जास्‍पद स्‍थिती !

राजस्‍थान, मिझोराम, मध्‍यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगाणा या ५ राज्‍यांतील विधानसभांच्‍या निवडणुकांच्‍या कालावधीत आतापर्यंत १ सहस्र ७६० कोटी रुपयांची दारू, अमली पदार्थ, रोख रक्‍कम आणि महागडे धातू जप्‍त करण्‍यात आले आहेत.

नेपाळ सरकारचा राष्‍ट्रप्रेमी निर्णय जाणा !

नेपाळ सरकारने ‘इज्‍तिमा’ हा मुसलमानांचा वार्षिक धार्मिक कार्यक्रम रहित करण्‍यास भाग पाडले आहे. या कार्यक्रमाच्‍या नावाखाली काही कट्टर मुसलमान धार्मिक नेते येणार होते, ज्‍यांना भारतासह अनेक देशांनी त्‍यांच्‍या देशात येण्‍यास बंदी घातलेली आहे.

गांधीवादी काँग्रेसींची हिंसाचारी वृत्ती जाणा !

केरळमधील काँग्रेसचे खासदार राजमोहन उन्‍नीथन् यांनी पॅलेस्‍टाईनच्‍या समर्थनार्थ काढण्‍यात आलेल्‍या फेरीच्‍या वेळी ‘इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्‍याहू यांना कोणताही खटला चालवल्‍याविना गोळ्‍या घालून ठार केले पाहिजे’, असे विधान केले.

हलाल प्रमाणपत्राच्‍या विरोधात अशी कारवाई देशभरात व्‍हावी !

कोणताही अधिकार नसतांना खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने आदी वस्‍तूंसाठी आस्‍थापनांना हलाल प्रमाणपत्र देऊन त्‍यांच्‍याकडून पैसे उकळणार्‍यांच्‍या विरोधात उत्तरप्रदेशातील योगी आदित्‍यनाथ सरकारने इस्‍लामी संस्‍थांवर गुन्‍हा नोंदवला आहे.

हिंदूंच्‍या देशात हिंदूंची मंदिरे असुरक्षित !

झारखंडधील मांडर येथे हिंदूंच्‍या ४ मंदिरांत तोडफोडीच्‍या घटना घडल्‍या. जम्‍मू-काश्‍मीरमधील पूंछ येथील शिवमंदिरात आतंकवाद्यांनी बाँबस्‍फोट केला. या प्रकरणी अहमद शेख या सरकारी शिक्षकासह अब्‍दुल रशीद आणि मेहराज अहमद या आतंकवाद्यांना अटक करण्‍यात आली.

भारतियांच्‍या संघटित प्रयत्नांचा चांगला परिणाम !

‘कॉन्‍फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’चे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, यंदा चीनला दिवाळीच्‍या कालावधीत व्‍यवसायात १ लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेचा तोटा झाला.

बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण कोण करणार ?

बांगलादेशमध्‍ये आगामी निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर हिंदूंवरील आक्रमणांमध्‍ये वाढ होऊ लागली आहे. हिंदूंच्‍या धार्मिक स्‍थळांना अपवित्र केले जात असून महिलांवर बलात्‍कार आणि हिंदूंच्‍या हत्‍या होत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी हिंदूंनी पलायन चालू केले आहे.

हिंदूंच्‍या संघटित शक्‍तीचा परिणाम जाणा !

हिंदु संघटनांच्‍या विरोधानंतर हिंदूंच्‍या सणानिमित्त दागिन्‍यांची विज्ञापने करूनही हिंदु संस्‍कृतीप्रमाणे महिलांना कुंकू लावलेले न दाखवणार्‍या अनेक दागिने व्‍यापार्‍यांनी यावर्षी सुधारणा करत दिवाळीनिमित्त केलेल्‍या दागिन्‍यांच्‍या विज्ञापनांत महिलांना कुंकवासह दाखवले आहे.

अशा हिंदुद्रोह्यांवर सरकार कधी कारवाई करणार ?

समाजवादी पक्षाचे नेते स्‍वामी प्रसाद मौर्य यांनी ‘आतापर्यंत ४ हातांचे मूल जन्‍माला आले नाही, तर ४ हातवाली लक्ष्मी (देवी) कशी जन्‍माला येऊ शकते ?’, असे ट्‍वीट केले आहे.

धर्मांध मुसलमानांची इच्छा जाणा !

तेलंगणात विधानसभा निवडणुकीचा प्रचाराच्या वेळी भाग्यनगरमध्ये एका मुसलमान महिलेने खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या समोरच प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांची हत्या करण्याची धमकी दिली.