अर्थसंकल्प ‘स्वयंपूर्ण गोवा’ आणि उद्योग यांना चालना देणारा असेल ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

अर्थसंकल्प २७ मार्च या दिवशी मांडला जाणार नाही. अर्थसंकल्प  महसूल वाढवणारा, खासगी गुंतवणुकीला चालना देणारा आणि राज्यात नवीन उद्योग आणणारा असेल. अर्थसंकल्पातील योजना लागू करण्यासाठी प्रशासकीय सुधारणा करण्यात येणार आहेत.

विधानसभा अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करणार; पण चर्चा नंतर ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

‘‘अधिवेशनामध्ये कोणत्या दिवशी अर्थसंकल्प सादर करणार, याचा दिनांक निश्चित झालेला नाही. विधानसभेचे अधिवेशन २७ मार्च ते ३१ मार्च या ५ दिवसांत घेण्यात येणार होते; परंतु ३१ मार्च या दिवशी रामनवमी असल्याने अधिवेशन ४ दिवस करण्यात आले.’’

गोव्यात संरक्षण उत्पादन केंद्र बनण्याची  क्षमता ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोव्याला संरक्षणक्षेत्राला पुरवठा करण्याचे केंद्र बनण्याची चांगली संधी आहे. गोव्यात आधीच वेर्णा येथे जहाजबांधणीसाठी कोकण सागरी क्लस्टर आहे, ज्यामुळे ३ सहस्र रोजगार निर्माण होतील.

मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांची ४ वर्षांची यशस्वी वाटचाल ! – प्रदेश भाजप

डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोव्याला भारतातील सर्वांत विकसित राज्य होण्यासाठी आवश्यक बळ आणि धैर्य त्यांना लाभो, हीच सदिच्छा !

पायाभूत विकासासाठी सार्वजनिक आणि खासगी भागीदारीवर भर देणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

आता दुसर्‍या टप्प्यातील पायाभूत विकास साधणे आणि नवीन मानवी स्रोत सिद्ध करणे, हे आव्हान सरकारसमोर आहे. सार्वजनिक आणि खासगी या भागीदारीतून ते साध्य होऊ शकेल.

गोवा : मेरशी येथील ‘जंक्शन’वर कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित ‘सिग्नल’ यंत्रणेचे उद्घाटन

नवीन यंत्रणेमुळे अपघातांवर नियंत्रण मिळवण्यास साहाय्य होईल. या यंत्रणेत वाहतुकीचे नियंत्रण करण्यासह वाहतूक नियमांचा भंग करणार्‍या वाहनचालकांची कॅमेर्‍याद्वारे नोंद होईल.

वनांना लागलेल्या आगीच्या संदर्भात पंतप्रधान कार्यालयात अहवाल सादर ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

एफ्.एस्.आय्. (फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया) कडून उपग्रहाद्वारे केलेल्या वनाच्या सर्वेक्षणामध्ये १ मार्च ते १२ मार्च या कालावधीत संपूर्ण भारतात जवळपास ४२ सहस्र ७९९ ठिकाणी वनाला आग लागल्याचे आढळून आले आहे.

गोव्यात वनक्षेत्रांतील आग विझली ! – वनमंत्री विश्वजीत राणे

‘‘आग विझलेली असली, तरी ती पुन्हा चालू होऊ नये, यासाठी संबंधित ठिकाणांवर देखरेख ठेवली जात आहे. दिरोडे, म्हादई अभयारण्यात सुर्ला आदी ठिकाणी आग पुन्हा लागण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी जास्त देखरेख ठेवण्यात आली आहे.’’

सौम्य कलमाखाली गुन्हा नोंदवणार्‍या अधिकार्‍याला निलंबित करणार ! – मुख्यमंत्री

पर्यटक जतीन शर्मा यांनी हॉटेलचा कर्मचारी रायस्टन डायस याच्या अनियंत्रित वागण्याविषयी विरुद्ध हॉटेल व्यवस्थापनाकडे तक्रार केली होती आणि याचा वचपा काढण्यासाठी रायस्टनने त्याच्या साथीदारासह जतीन शर्मा यांच्यावर प्राणघातक आक्रमण केले.

म्हादई अभयारण्यात आग जाणीवपूर्वक लावलेली असू शकते ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

असे असेल, तर हे कृत्य करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.