पणजी – गोवा सरकारच्या वतीने खासगी आस्थापनांच्या सहयोगाने सार्वजनिक आणि खासगी भागीदारी या तत्त्वावर प्रकल्प उभारण्यावर अधिक भर दिला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.
ते म्हणाले,
‘‘सार्वजनिक आणि खासगी भागीदारीत प्रकल्प उभारण्यासाठी गुंतवणूक करण्यास खासगी आस्थापनांबरोबर सरकार भागीदारी करेल. झुआरी पूल, अटल सेतू आणि मोपा विमानतळ हे प्रकल्प पूर्ण झाल्याने पर्यटनाच्या दृष्टीकोनातून जवळपास ५० टक्के पायाभूत सुविधा पूर्ण झाली आहे. आता दुसर्या टप्प्यातील पायाभूत विकास साधणे आणि नवीन मानवी स्रोत सिद्ध करणे, हे आव्हान सरकारसमोर आहे. सार्वजनिक आणि खासगी या भागीदारीतून ते साध्य होऊ शकेल. २०२३-२४ या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये पर्यटन विकासामध्ये गुंतवणूक करण्यास आस्थापनांना आकर्षित करण्यावर भर दिला जाईल. आम्ही या भागीदारीसाठी क्षेत्र खुले ठेवले आहे. खासगी किंवा सरकारी भूमीवर गुंतवणुकीसाठी सरकारकडून साहाय्य मिळेल. प्रत्येक प्रकल्पामध्ये सरकार पैशांची गुंतवणूक करू शकत नाही. त्यामुळे आम्ही या भागीदारीवर भर देत आहोत.’’